IPL Auction 2022 Sakal
IPL

IPL Auction : 'अंगापेक्षा भोंगा मोठा'; एक विकेट पडली 29 लाखाला!

सुशांत जाधव

IPL Auction 2022: बंगळुरुमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात भारतीय गोलंदाजांना चांगला भाव मिळाला. दोन दिवसीय मेगा लिवावात (IPL Mega Auction) काही खेळाडूंवर अक्षरश: पैशांची बरसात झाली. आयपीएलच्या लिलावात फ्रँचायझींनी काही खेळाडूंना दिलेली मोठी रक्कम मात्र संभ्रमात पाडणारी होती. अनेक क्रिकेट चाहत्यांना काही खेळाडूंवर एवढा पैसा का ओतला? असा प्रश्नही पडला असेल. जाणून घेऊयात अशा तीन खेळाडूंबद्दल ज्यांना अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाले.

1. शिवम मावी (Shivam Mavi)

कोलकाताकडून खेळणाऱ्या शिवम मावीची मूळ किंमत 40 लाख होती. कोलकाताने 7.25 कोटी देऊन पुन्हा त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. लखनऊनंही त्याला आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी कोलकाताने बाजी मारली. मावीला मिळालेली मोठी रक्कम चक्रावून सोडणारीच आहे. त्याने 6 प्रथम श्रेणी सामन्यात 25 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय आयपीएलमधील 26 सामन्यात 25 विकेट त्याच्या खात्यात आहेत. मेगा लिलावातील मोठ्या बोलीमुळे आयपीएलमधील त्याच्या एका विकेटची किंमत जवळपास 29 लाखच्या घरात पोहचली आहे.

2. वनिंदु हसारंगा (Wanindu Hasaranga)

श्रीलंकाचा लेग स्पिनर आणि फलंदाज वनिंदु हसरंगाची मूळ किंमत 1 कोटी होती. पंजाब आणि आरसीबीमध्ये त्याला संघात घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळाली. फायनली आरसीबीने त्याला 10.75 कोटीत आपल्या संघात घेतलं. आयपीएलमधील 2 सामन्यात त्याला एकही विकेट मिळालेली नाही. एवढेच काय तर त्याने एकच धाव केली आहे. 6 ओव्हर फेकून त्यानं कोट्यवधी कमावले असेच म्हणावे लागेल.

3. नीतीश राणा (Nitish Rana)

नितीश राणा पुन्हा एकदा केकेआरसाठी खेळताना दिसणार आहे. 28 वर्षीय राणादानं भारताकडून 1 वनडे आणि 2 टी20 सामने खेळले आहेत. 1 कोटीच्या या गड्यासाठी कोलकातानं 8 कोटी मोजले. आयपीएलच्या गत हंगामात राणाने 17 सामन्यात 29.46 च्या सरासरीनं 383 धावा केल्या होत्या. मागील हंगामातील कामगिरी पाहता त्याला मिळालेली रक्कम ही खूप मोठी आहे. त्याच्या एका धावेसाठी कोलकताने 2,08,877 रुपये मोजले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT