IPL Auction 2022 Jofra Archer  Sakal
IPL

अंबानींच्या पोराचा हात खालीच येईना; जोफ्रासासाठी टेबलवर तगडी फाईट; अन्...

सुशांत जाधव

IPL Auction 2022 Jofra Archer In Mumbai Indians : आयपीएलच्या मेगा लिलावात पहिल्या दिवशी मोजक्या मंडळींना ताफ्यात घेणाऱ्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) शेवटला जोरदार फटकेबाजी करण्याची रणनिती अवलंबल्याचे दिसते. दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाही त्यांनी अनकॅप्ड प्लेयरला ताफ्यात घेऊन खरेदीला सावध सुरुवात केली. प्रतिस्पर्धी फ्रेंचायझींच्या बटव्यातील रक्कम खाली झाली तशी अंबानींच्या चिरंजीवांचा हात वर वर उंचावत गेला. जोफ्रा आर्चरला संघात घेण्यासाठी मुंबईने या दिवसातील मोठी बोली लावली.

यापूर्वी जोफ्रा आर्चर राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसले होते. राजस्थानने आपल्या या गड्यासाठी ज्यावेळी बोली लावली. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात काहीही झालं तरी जोफ्राला सोडणार नाही, असे चित्र पाहायला मिळाले. राजस्थान बोली लावत असताना आकाश अंबानी यांचा हात काही खाली येताना दिसत नव्हता.

या दोघांत तगडी फाईट सुरु असताना सनरायझर्स हैदराबादच्या काव्या मारन यांनी जोफ्राला घेण्यासाठी रस दाखवला. त्यांनी 7 कोटी 50 लाख खर्च करण्याची तयारी दर्शवली. पण शेवटी अंबानी अँण्ड कंपनीने बाजी मारली. जोफ्राला त्यांनी 8 कोटीत आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं. जसप्रित बुमराहच्या साथीला मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची प्रमुख धुरा त्याच्या खांद्यावर असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT