preity zinta
preity zinta  Sakal
IPL

IPL Auction : शाहरुख खानची गोष्ट प्रिती मनावर घेणार?

सुशांत जाधव

IPL Auction 2022 : आयपीएलच्या मेगा लिलावात पंजाब किंग्जनं तगडी संघ बांधणी केली आहे. भारताचा अनुभवी शिखर धवनसह (Shikhar Dhawan) दमदार खेळाडूंचा भरणा करत त्यांनी एक मजबूत टीम बनवली आहे. मेगा लिलावाआधी मंयाक अग्रवाल (12 कोटी) आणि अर्शदीप सिंग (4 कोटी) या दोघांना रिटेन करत पंजाबने पर्समध्ये मोठी रक्कम शिल्लक ठेवली. त्याचा फायदा त्यांनी मेगा लिलावात केलाही. (Shahrukh Khan Want Shikhar Dhawan Captain as preity zinta punjab kings)

इंग्लंडच्या लायम लिविंगस्टोनवर त्यांनी मोठी बोली लावली. त्याच्यासोबतच कॅरेबियन अष्टपैलू ओडेन स्मिथलाही त्यांनी आपल्या ताफ्यात घेतलं. फलंदाजीत जॉनी बेयरस्ट्रो आणि गोलंदाजीत कगिसो रबाडाही त्यांच्या गळाला लागला. आता दिग्गजांमध्ये कॅप्टन्सीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पंजाबने शाहरुख खानवरचे प्रेम पुन्हा दाखवून दिले. भारतीय अष्टपैलू आणि मॅच विनिंग खेळी करण्याची क्षमता असलेल्या शाहरुखसाठी त्यांनी 9 कोटी मोजले. संघात पुन्हा सामील झालेल्या शाहरुखने स्टार स्पोर्टसशी संवादही साधला. पंजाब संघाने (Punjab Kings) दाखवलेला भरवशावर आभार व्यक्त करताना त्याने आपल्या मनातील भावनाही व्यक्त केली. या कार्यक्रमात त्याला कोणाच्या कॅप्टन्सीखाली खेळायला आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. रिटेन प्लेयर मयांक अग्रवाल आणि शिखर धवन असे दोन पर्याय त्याला देण्यात आले होते. यावर शाहरुख खानने शिखर धवनचे नाव घेतले. शिखर धवन हा अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल, असे मत त्याने व्यक्त केले.

डावखुरा सलामीवीर शिखर धवनसाठी पंजाबने 8 कोटी 25 लाख रुपये मोजले आहेत. तो पंजाबच्या संघाच्या डावाची सुरुवात करणार हे पक्के आहे. पण पंजाबसाठी तो कॅप्टन्सीचा एक उत्तम पर्यायही असेल. शिखर धवनने टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विराट रोहितच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौरा गाजवला होता. त्यामुळेच शाहरुख खानने बोलून दाखवलेली इच्छा प्रिती झिंटाचा (Preity Zinta) पंजाब संघ पूर्ण करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT