M. Siraj Sakal
IPL

Ipl 2023 : राहुलची सेना तिसऱ्या विजयासाठी सज्ज; रॉयल चॅलेंजर्स पुनरागमन करण्याचा ध्यास

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि लखनौ सुपर जायंटस्‌ यांच्यामध्ये उद्या आयपीएलमधील लढत बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगणार आहे.

सकाळ ऑनलाईन टीम

बंगळूर - रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि लखनौ सुपर जायंटस्‌ यांच्यामध्ये उद्या आयपीएलमधील लढत बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाल्यानंतर आता पुन्हा विजयपथावर येण्यासाठी यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा संघ प्रयत्न करताना दिसेल. लखनौ सुपर जायंटस्‌ संघ तिसऱ्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावेल.

बंगळूर संघाने सलामीच्या लढतीत मुंबईचा धुव्वा उडवला. त्यानंतर कोलकाताविरुद्ध २०४ धावांचा पाठलाग करताना बंगळूरच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती व सुयश शर्मा या फिरकी गोलंदाजांसमोर त्यांची डाळ शिजली नाही. १२३ धावांमध्येच त्यांचा डाव गडगडला.

बंगळूरला कर्णधार फाफ ड्युप्लेसी व विराट कोहली या दोनच फलंदाजांवर अवलंबून राहून चालणार नाही. वनिंद हसरंगा हा श्रीलंकेसाठी खेळत आहे, तर जोश हेझलवूड याला दुखापत झाली आहे. त्यामुळे गोलंदाजी विभागातही बंगळूरला अपयश येत आहे. हसरंगा व हेझलवूड हे दोघेही या आठवड्यात बंगळूर संघाशी जोडले जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र मोहम्मद सिराज व हर्षल पटेल या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत अव्वल दर्जाची गोलंदाजी करणे आवश्‍यक आहे.

वूड, आवेश तंदुरुस्त होण्याची प्रतीक्षा

लखनौ संघाने ७ एप्रिलला झालेल्या लढतीत हैदराबादला हरवले. या लढतीत मार्क वूड व आवेश खान ही जोडगोळी खेळली नाही. वूडला ताप आला होता, तर आवेशला दुखापत झाली होती. या लढतीत कृणाल पंड्या, रवी बिश्‍नोई व अमित मिश्रा या फिरकी गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करीत लखनौला विजय मिळवून दिला; पण वूड व आवेश हे तंदुरुस्त होणे गरजेचे आहे. कारण त्यांच्याकडे अनुभव आहे. लखनौला गरज असताना त्यांचा उपयोग होऊ शकतो. दरम्यान, कर्णधार राहुल, काईल मेयर्स व निकोलस पुरन यांच्याकडून समाधानकारक फलंदाजी झाली असून दीपक हुडा, मार्कस स्टॉयनीस यांना आपला खेळ उंचवावा लागणार आहे.

आजची आयपीएल लढत

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूर वि. लखनौ सुपर जायंटस्

  • स्थळ - बंगळूर

  • वेळ - सायंकाळी ७.३० वाजता

  • प्रक्षेपण - स्टार स्पोर्टस्

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT