Suryakumar Yadav sakal
IPL

IPL 2023 Playoffs : प्ले-ऑफसाठी लखनौविरुद्ध मुंबईला आज विजय हवाच

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात प्ले-ऑफसाठी कमालीची चुरस दिसून येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात प्ले-ऑफसाठी कमालीची चुरस दिसून येत आहे.

लखनौ - आयपीएलच्या यंदाच्या मोसमात प्ले-ऑफसाठी कमालीची चुरस दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स-लखनौ सुपर जायंटस्‌ यांच्यामध्ये उद्या लढत रंगणार असून दोन्ही संघांना प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी विजयाची आवश्‍यकता आहे. बंगळूर व गुजरात या दोन्ही संघांना पराभवाचा धक्का देणारा मुंबई इंडियन्सचा संघ विजयरथावर स्वार आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर लखनौ सुपर जायंटस्‌चा संघही फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये रोमहर्षक लढत पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईला पहिल्या टप्प्यात चढ-उतारामधून जावे लागले; पण मागील दोन लढतींमध्ये पाच वेळच्या विजेत्या ठरलेल्या मुंबई संघाने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. सुरुवातीच्या लढतींमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने मागील दोन लढतींमध्ये सामन्याचा नूर बदलणारी फलंदाजी केली आहे.

सूर्यकुमार (४७९ धावा), इशान किशन (३६६ धावा), कॅमेरुन ग्रीन (२७७ धावा) यांच्या खांद्यावर मुंबईची फलंदाजी अवलंबून असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा (२२० धावा) याला सूर गवसलेला नाही, पण एक चमकदार खेळी त्याच्या आत्मविश्‍वासात भर घालू शकते. तिलक वर्माच्या अनुपस्थितीत नेहल वाधेरा छान फलंदाजी करीत आहे. टीम डेव्हिड दिमतीला आहेच.

जसप्रीत बुमरा व जोफ्रा आर्चर या दिग्गज गोलंदाजांच्या अनुपस्थितीत मुंबईचा गोलंदाजी विभाग कमकुवत वाटतो. पण पियूष चावला याने १९ व जेसन बेहरेनडॉर्फ याने १२ फलंदाज बाद करून आपली चुणूक दाखवली आहे. कुमार कार्तिकेय, अर्शद खान, आकाश माधवल, ख्रिस जॉर्डन यांना उर्वरित लढतींमध्ये ठसा उमटवावा लागणार आहे.

लखनौची मदार या खेळाडूंवर

के. एल. राहुल याच्या अनुपस्थितीत काईल मेयर्स, निकोलस पुरन, मार्कस स्टॉयनीस, क्विंटॉन डी कॉक, आयुष बदोनी यांना फलंदाजीत धमक दाखवावी लागणार आहे. तसेच कर्णधार कृणाल पंड्या याच्याकडून अष्टपैलू कामगिरीची पुन्हा एकदा अपेक्षा आहे.

लखनौ येथील स्टेडियमच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे रवी बिश्‍नोई, अमित मिश्रा या फिरकी गोलंदाजांसमोर मुंबईच्या फलंदाजांना समर्थपणे फलंदाजी करावी लागणार आहे. आवेश खान याला गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. त्याच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी फलंदाज धावांची लूट करीत आहेत.

आजची लढत -

मुंबई इंडियन्स- लखनौ सुपर जायंटस्

स्थळ- लखनौ

वेळ- संध्याकाळी ७.३० वाजता

प्रक्षेपण- स्टार स्पोर्टस्

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT