KL Rahul Sakal
IPL

IPL 2023 : विकेट गमावल्यामुळे संथ फलंदाजी - के. एल. राहुल

लखनौने सोमवारी बंगळूरवर एक विकेट राखून सनसनाटी विजयाला गवसणी घातली. या लढतीत मार्कस स्टॉयनीस, निकोलस पुरन या फलंदाजांनी आक्रम फलंदाजी केली आणि लखनौला थरारक विजय मिळवून दिला.

सकाळ वृत्तसेवा

लखनौने सोमवारी बंगळूरवर एक विकेट राखून सनसनाटी विजयाला गवसणी घातली. या लढतीत मार्कस स्टॉयनीस, निकोलस पुरन या फलंदाजांनी आक्रम फलंदाजी केली आणि लखनौला थरारक विजय मिळवून दिला.

बंगळूर - लखनौने सोमवारी बंगळूरवर एक विकेट राखून सनसनाटी विजयाला गवसणी घातली. या लढतीत मार्कस स्टॉयनीस, निकोलस पुरन या फलंदाजांनी आक्रम फलंदाजी केली आणि लखनौला थरारक विजय मिळवून दिला, पण कर्णधार के. एल. राहुल याने या लढतीत २० चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. लढतीनंतरच्या पत्रकार परिषदेत संथ फलंदाजीबद्दल राहुल म्हणाला, एका बाजूने विकेट गमावले होते, त्यामुळे दुसऱ्या बाजूने मला खेळपट्टीवर टिकून राहायचे होते. याच कारणामुळे संथ फलंदाजी केली.

लखनौ येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक आहे. या स्टेडियमवर आम्ही दोन लढती खेळल्या आहेत. या खेळपट्टीवर धावांचा निकष लावता येणार नाही. बंगळूरविरुद्धच्या लढतीत आम्ही विकेट गमावले होते. त्या वेळी सावध फलंदाजी करणे गरजेचे होते. निकोलस पुरन याच्यासोबत आणखी काळ फलंदाजी केली असती, तर आधीच आम्ही विजय मिळवला असता. तसेच जास्त धावा केल्या असत्या, तर माझा फलंदाजी स्ट्राईक रेटही वाढला असता, असे राहुल आवर्जून सांगतो.

स्टॉयनीस, पुरनमुळे विजय साकारला

राहुलने याप्रसंगी मार्कस स्टॉयनिस व निकोलस पुरन यांच्या आक्रमक फलंदाजीचे कौतुक केले. बंगळूरातील चिन्नास्वामी स्टेडियमवर थरारक लढती पार पडल्या आहेत. येथे सर्वाधिक वेळा अखेरच्या षटकात निकाल लागतो. मार्कस स्टॉयनीस व निकोलस पुरन यांच्या अद्‌भुत व आक्रमक फलंदाजीमुळे लखनौला विजय साकारता आला आणि दोन महत्त्वाच्या गुणांची कमाई करता आली, असेही राहुल स्पष्ट सांगतो.

टी-२० क्रिकेटमध्ये पाच, सहा व सात या क्रमांकावर फलंदाजी करणारे फलंदाज सामन्याचा नूर बदलू शकतात. याच क्रमांकावरील फलंदाजांच्या कामगिरीवर लढतीचा निकाल क्षणार्धात बदलतो. याचमुळे आम्ही या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मार्कस स्टॉयनीस, निकालस पुरन व आयुष बदोनी यांची निवड केली आहे.

- के. एल. राहुल, कर्णधार, लखनौ सुपर जायंटस्

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: निवृत्तीच्या वनडेत एलिसा हेलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, स्मृती मानधनाचा विक्रमही मोडला; ऑस्ट्रेलियाचा भारताला व्हाईटवॉश

Navi Mumbai: ऐरोलीत ‘नो पार्किंग’ फलक नाममात्र! रुग्णालयाबाहेर बेकायदा पार्किंग; रुग्ण, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा

Holika Dahan 2026: यंदा पहिल्यांदाच होळीची पूजा करताय? जाणून घ्या होलिका दहनाची विधिवत आणि योग्य पद्धत

Latest Marathi News Update : महिन्याभरात राज्यातील सगळ्या कार्यालयांचे पॉश ऑडिट करण्याचे महिला आयोगाचे निर्देश

Accidental Death: शेतकऱ्याचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू; बार्शी तालुक्यातील धक्कादायक घटना, शेतात जनावरे घेऊन गेले अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT