MS Dhoni vs Hardik Pandya 
IPL

CSK vs GT IPL Final 2023 : शेरास सव्वाशेर! चेन्नईचे ‘हाय फाय’ की गुजरातची ‘डबल बारी’, जाणून घ्या दोन्ही संघाची ताकद

चेन्नई संघात सुपरस्टार खेळाडू नसले तरी धोनीने प्रत्येक खेळाडूत सुपरस्टार होण्याचा मंत्र फुंकलेला आहे त्यामुळे...

सकाळ ऑनलाईन टीम

CSK vs GT IPL Final 2023 : १९ वर्षांपूर्वी महेंद्रसिंग धोनी भारतीय संघात पदार्पण करत होता तेव्हा चार वर्षांचा शुभमन गिल भारत-पाक सीमेवरील फझिल्का गावात आपल्या आजोबांसोबत छोटी क्रिकेटची बॅट घेऊन कसाबसा उभा राहत होता. आता त्याच ४१ वर्षीय धोनीच्या पाचव्या आयपीएलमध्ये २३ वर्षीय गिल उभा आहे.

यंदाच्या आयपीएल विजेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता कमालीची ताणली आहे. एकीकडे दिग्गज धोनी विरुद्ध नवा सुपरस्टार गिल असे चित्र असताना दुसरीकडे गुरू धोनी आणि त्याचा शिष्य हार्दिक पंड्या असेही रंग आजच्या आयपीएल अंतिम सामन्यात भरले आहेत.(MS Dhoni vs Hardik Pandya)

काही अनपेक्षित निकालांनी आणि कोणाचेही निर्विवाद वर्चस्व नसलेली हे यंदाच्या आयपीएलचे वैशिष्ट्य ठरले असले, तरी प्रत्येकी १४ साखळी सामन्यांनंतर पहिले दोन क्रमांक मिळवणाऱ्या गुजरात आणि चेन्नई यांच्यातच आता विजेतेपदाचा सामना होत आहे. पहिला क्वॉलिफायर जिंकून चेन्नईने अंतिम फेरी गाठण्याचा मान प्रथम मिळवला असला, तरी गुजरात त्यांच्या पाठोपाठ आले आणि आपणही विजेतेपदाचे दावेवार आहोत हे मुंबई इंडियन्सला पराभूत करून ठणकावून सांगितले आहे.

एकीकडे महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा चेन्नई संघ पाचव्या विजेतेपदासाठी झुंझणार आहेत; तर दुसरीकडे गतवर्षी दाखल झालेले गुजरात आपल्या दुसऱ्या अजिंक्यपदासाठी शर्थ करतील.

तब्बल १ लाख ३२ हजार प्रेक्षकसंख्या असलेले नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम खचाखच भरलेले असेल. एकीकडे आपली होम टीम गुजरात जिंकावी अशी त्यांची इच्छा असेलच, पण दुसरीकडे धोनी... धोनीचा गजर स्टेडियमचा आसमंत भेदून टाकणाराही असेल.

निवृत्तीबाबत विचार करायला अजून आठ ते नऊ महिने आहेत असे धोनी सांगत असला तरी अनपेक्षित चाली करणारा धोनी आज कोणताही निर्णय जाहीर करू शकतो. त्यामुळे यलो जर्सीत धोनीला अखेरचे खेळत असलेले पाहताना प्रेक्षकही भारावून होतील.

डावे-उजवे नाही

अडखळत सुरुवात करणाऱ्या चेन्नईने उत्तरोत्तर आपला संघ अधिक बळकट करत अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला; तर गतविजेते असल्याने गुजरातने आपल्या लौकिकाप्रमाणे घोडदौड केली. म्हणून गुजरातने १४ साखळी सामन्यांत १० विजय मिळवले; तर चेन्नईच्या १४ पैकी ८ लढतीत विजय मिळाला.

चेन्नईची गोलंदाजीही भक्कम

एकीकडे तीन शतके करून गिल भलत्याच फॉर्मात असला तरी आज त्याला चेन्नई संघातील मथिषा पथिराना (१५ सामन्यांत १७ विकेट) आणि तुषार देशपांडे (१५ सामन्यांत २१ विकेट) यांच्याएवढाच धोका दीपक चहरकडून होऊ शकतो. एकूणच काँटे की टक्कर पाहायला मिळणार हे नक्की आहे.

गुजरातची ताकद : यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक कामगिरी करणारे गुजरातकडे आहेत. मोहम्मद शमीकडे सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजासाठी असलेली पर्पल कॅप आहे; तर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजासाठी असलेली ऑरेंज कॅप शुभमन गिलने मिळवली आहे. इतकेच काय तर गोलंदाजीतील पहिले तीन खेळाडू शमी (२८ विकेट), राशीद खान (२७) आणि मोहित शर्मा (२४) त्यांच्याकडे आहेत.

चेन्नईची ताकद : चेन्नई संघात सुपरस्टार खेळाडू नसले तरी धोनीने प्रत्येक खेळाडूत सुपरस्टार होण्याचा मंत्र फुंकलेला आहे, त्यामुळे अजिंक्य रहाणे (१३ सामने २९९ धावा), डेव्हिन कॉन्वे (१५ सामने ६२५), ऋतुराज गायकवाड (१५ सामने ५६४) असे त्यांचे फलंदाज फॉर्मात आहेत. एवढेच नव्हे, तर शिवम दुबेने १५ सामन्यांतून ३८६ धावा केल्या असल्या तरी त्याने शुभमन गिलएवढेच ३३ षटकार मारले आहेत.

अंतिम संघ यातून निवडणार ः

गुजरात ः हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, डेव्हिड मिलर, साई सुदर्शन, वृद्धिमन साहा, मॅथ्यू वेड, राशीद खान, राहुल तेवटिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, दर्शन नलकांडे, नूर अहमद, जोशूआ लिटल, मोहित शर्मा.

चेन्नई ः महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हिन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, राजवेंद्र हंगर्गेकर, मिशेल सँटनर, मथिषा पथिराना, महेश तिक्षाणा, तुषार देशपांडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT