IPL Media Rights Amazon May Withdraw From Digital Streaming Rights Race Reliance In Strong Position  esakal
IPL

IPL Media Rights :बेझोस यांची माघार, मुकेश अंबानींची दावेदारी होणार प्रबळ?

अनिरुद्ध संकपाळ

क्रिकेट जगतातील सर्वांत मोठी लीग इंडियन प्रीमियर लीगच्या मीडिया राईट्सची टेंडर प्रक्रिया जवळपास संपत आली असून येणाऱ्या पाच वर्षासाठी आयपीएल मीडिया राईट्स कोणाकडे असतील याची ई-लिलाव प्रक्रिया 12 जूनला सुरू होण्याची शक्यता आहे. (IPL Media Rights Amazon May Withdraw From Digital Streaming Rights Race Reliance In Strong Position)

दरम्यान, एका वृत्तानुसार आयपीएलच्या डिजीटल स्ट्रिमिंग राईट्ससाठी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जेफ बेझोस यांची अमेझॉन आणि मुकेश अंबानी यांच्या रिसायन्स यांच्यात टक्कर आहे. मात्र ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार अमेझॉन या रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिलायन्सची दावेदारी प्रबळ होण्याची शक्यता आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार अमेझॉन आयपीएलच्या जवळपास 60 हजार कोटी रूपयांच्या मीडिया राईट्स मिळवण्याच्या रेसमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या या जायंट कंपनीने भारतात यापूर्वीच जवळपास 6 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे अमेझॉनला आता फक्त आयपीएलच्या स्ट्रिमिंग राईटसाठी अजून गुंतवणूक करणे व्यावसायिक दृष्ट्या व्यवहार्य वाटत नाही. असे असले तरी अमेझॉनच्या प्रतिनिधींनी अधिकृतरित्या याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

जर अमेझॉन डिजीटल स्ट्रिमिंग राईट मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर पडली तर याचा फायदा मुकेश अंबानींना होण्याची शक्यता आहे. याचबरोबर डिजीटल मीडिया राईट्ससाठी रिलायन्स, डिज्ने आणि सोनी ग्रुप यांच्यात रस्सीखेच होणार आहे. सध्या तरी यामध्ये रिलायन्सची दावेदारी तगडी दिसत आहे. ज्या कोणत्या कंपनीला मीडिया राईट्स मिळतील ती कंपनी 140 कोटी लोकांच्या देशात एक प्रमुख मीडिया प्लेअर म्हणून आपली ओळख मजबूत करू शकते.

आयपीएल मीडिया राईट्ससाठी 12 जूनपासून इ-लिलाव सुरू होणार आहे. सध्या आयपीएलचे लाईव्ह स्ट्रिमिंगचे राईट डिज्नी प्लस हॉटस्टार यांच्याकडे आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामापासून गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट हे दोन नवे संघ सामिल झाल्यामुळे आता आयपीएल सामन्यांची संख्या 60 वरून 74 वर गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT