तिसरा खेळाडू | मोहम्मद सिराज  sakal
IPL

IPL news 2023 : भ्रष्टाचाराचा संशय आल्याने मोहम्मद सिराज वेळीच सावध

हैदराबादमधील ड्रायव्हरचा संपर्क

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट पुन्हा एकदा फिक्सिंगने डोके वर काढले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्याशी एका व्यक्तीने ड्रेसिंग रूममधील माहिती देण्यासाठी संपर्क साधला. हैदराबादमधील एका ड्रायव्हरने त्याला फोन केला होता. सिराजने तात्काळ बीसीसीआयला कळवल्यामुळे आता भ्रष्टाचारविरोधी युनिट या प्रकरणाचा तपास करीत आहे.

पीटीआय संस्थेकडून हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडून या वेळी सांगण्यात आले, की सट्टेबाजाकडून सिराजशी संपर्क साधला गेलेला नाही. हैदराबादमधील एका ड्रायव्हरचे सिराजशी बोलणे झाले आहे. या व्यक्तीला बेटिंगचा नाद लागला आहे. यामध्ये त्याने बरीच रक्कम गमावली आहे. या व्यक्तीने भारतीय संघातील बातमी मिळवण्यासाठी सिराजशी संपर्क साधला होता.

भ्रष्टाचारविरोधी युनिटकडून सिराजशी संपर्क साधणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे. याप्रसंगी या युनिटमधील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले, की खेळाडूंनी काय करावे आणि काय करू नये याबाबत अधिकारी माहिती देत असतात. तसेच अनोळखी व्यक्तीने संपर्क साधल्यास त्या खेळाडूने त्वरित भ्रष्टाचारविरोधी युनिटला कळवणे गरजेचे असते, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

क्रिकेटमधील फिक्सिंगची मोठी प्रकरणे

  • १९९० - पाकिस्तानच्या सलीम मलिकला आजीवन बंदीची शिक्षा सुनावली

  • १९९४ - ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न व मार्क वॉ या खेळाडूंना सट्टेबाजाशी संपर्क साधून माहिती दिल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते.

  • २००० - दक्षिण आफ्रिकेच्या हॅन्सी क्रोनिएवर भारत दौऱ्यावर असताना फिक्सिंग केल्याप्रकरणी आजीवन बंदीची शिक्षा सुनावली होती.

  • २०१३ - आयपीएलमध्ये फिक्सिंग केल्यामुळे एस. श्रीशांत, अजित चंडिला व अंकित चव्हाण यांना शिक्षेला सामोरे जावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT