विजय शंकर आणि डेव्हिड मिलर sakal
IPL

IPL News : सहाव्या विजयासह गतविजेते गुजरात पुन्हा अव्वल स्थानी

गुजरातने कोलकता नाईट रायडर्सचा सात विकेटने पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला आणि गुणतक्त्यात पुन्हा आघाडी घेतली

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : विजय शंकर आणि डेव्हिड मिलर यांनी ऐन मोक्याच्या क्षणी टॉप गीअरमध्ये फलंदाजी केल्यामुळे गतविजेत्या गुजरातने कोलकता नाईट रायडर्सचा सात विकेटने पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला आणि गुणतक्त्यात पुन्हा आघाडी घेतली. गुजरातचा हा सहावा विजय आहे.

कोलकता संघाला ७ बाद १७९ धावांवर रोखल्यानंतर गुजरात संघाने हे आव्हान १७.५ षटकांत पार केले. ४९ धावा करणारा शुभमन गिल बाद झाला तेव्हा कोलकता संघाची ३ बाद ९३ अशी स्थिती होती. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विजय शंकर त्या वेळी सावध फलंदाजी करत होता.

अखेरच्या ३६ चेंडूत विजयासाठी ६९ धावांची गरज असताना शंकर आणि मिलर यांनी अचानक पवित्रा बदलला. चौकार, षटकारांची आतषबाजी करून त्यांनी १३ चेंडू शिल्लक असतानाच विजयाचा तिलक लावला.

पावसाचा व्यत्यय आला असला तरी त्याचा परिणाम खेळपट्टीवर झाला नाही. खरे तर या सामन्याची सुरुवात दोन्ही संघांसाठी फायदेशीर होती. एकीकडे गुजरातचे गोलंदाज कोलकता संघाच्या विकेट काढत होते, पण त्याच वेळी कोलकताचा सलामीवीर रेहमनुल्ल गुरबाझ धडाकेबाज फलंदाजी करत होता. त्याच्या हल्याचा फटका हार्दिक पंड्या आणि रशीद खान यांना सहन करावा लागला. त्यामुळे कोलकताची सुरुवात १० षटकांत आठ धावांच्या सरासरीची होती.

व्यंकटेश अय्यर, नितीश राणा अपयशी ठरल्यानंतर आंद्रे रसेलने आपला हिसका दाखवला.

संक्षिप्त धावफलक

कोलकता ः २० षटकांत ७ बाद १७९ (रेहमनुल्ला गुरबाझ ८१- ३९ चेंडू, ५ चौकार, ७ षटकार, आंद्रे रसेल ३४- १९ चेंडू, २ चौकार, ३ षटकार, मोहम्मद शमी ४-०-३३-३, जॉश लिटल ४-०-२५-२, नूर अहमद ४-०-२१-२) पराभूत वि. गुजरात ः १७.५ षटकांत ३ बाद १८० (शुभमन गिल ४९- ३५ चेंडू, ७ चौकार, हार्दिक पंड्या २६- २० चेंडू, २ चौकार, १ षटकार, विजय शंकर नाबाद ५१-२४ चेंडू, २ चौकार, ५ षटकार, डेव्हिड मिलर नाबाद ३२- १८ चेंडू, २ चौकार, २ षटकार, हर्षित राणा ३-०-२५-१)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT