Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Rohit Sharma  sakal
IPL

IPL News : मुंबईचा राजस्थानवर शानदार विजय

सूर्यकुमार, टीम डेव्हिडची फटकेबाजी, वानखेडेवर धावांचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई इंडियन्सने रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेला आयपीएलमधील १ हजारावा सामना मोठ्या दिमाखात जिंकला. मुंबई इंडियन्ससमोर अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची आवश्‍यकता असताना टीम डेव्हिडने जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर सलग तीन चेंडूंवर तीन षटकार खेचून मुंबई इंडियन्सला ६ विकेट राखून दणदणीत विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सचा हा मोसमातील चौथा विजय ठरला. राजस्थान रॉयल्सला चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

राजस्थानकडून मुंबईसमोर २१३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर बर्थ डे बॉय रोहित शर्मा ३ धावांवरच त्रिफळाचित झाला. त्यानंतर इशान किशन व कॅमेरून ग्रीन यांनी ६२ धावांची भागीदारी करताना मुंबईच्या आशा कायम ठेवल्या. रविचंद्रन अश्‍विनने इशानला २८ धावांवर आणि ग्रीनला ४४ धावांवर बाद करीत मुंबईला धक्के दिले.

त्यानंतर सूर्यकुमार यादवने तिलक वर्माच्या साथीने मुंबईसाठी किल्ला लढविला. दोघांनी ५१ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने २९ चेंडूंमध्ये ५५ धावांची खेळी केली. ट्रेंट बोल्टने त्याला बाद करीत राजस्थानसाठी मोलाची कामगिरी बजावली. या वेळी संदीप शर्माने धावत जाऊन पकडलेला झेल लाजवाब होता. शेवटी तिलक वर्मा (नाबाद २९ धावा) व टीम डेव्हिड (नाबाद ४५ धावा) यांनी मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, याआधी राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल व जॉस बटलर या फॉर्ममध्ये असलेल्या सलामी जोडीने ७२ धावांची भागीदारी करताना मुंबईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. अर्थात यामध्ये बटलरचा वाटा फक्त १८ धावांचा. पियुष चावलाच्या गोलंदाजीवर बटलर बाद झाला आणि जोडी तुटली.

यानंतर यशस्वीने एका बाजूने आक्रमक फलंदाजी कायम ठेवली. पण दुसऱ्या बाजूने कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. संजू सॅमसन (१४ धावा), देवदत्त पडीक्कल (२ धावा), जेसन होल्डर (११ धावा), शिमरॉन हेटमायर (८ धावा), ध्रुव जुरेल (२ धावा) यांच्याकडून निराशा झाली. पण यशस्वीच्या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थानला ७ बाद २१२ धावा फटकावता आल्या.

यशस्वीने ६२ चेंडूंमध्ये १६ चौकार व ८ षटकारांसह १२४ धावांची संस्मरणीय शतकी खेळी साकारली. अर्शदने त्याला बाद केले. अर्शद याने ३९ धावा देत ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पियूषने ३४ धावा देत २ फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स २० षटकांत ७ बाद २१२ धावा (यशस्वी जयस्वाल १२४ - ६२ चेंडू, १६ चौकार, ८ षटकार, जॉस बटलर १८, अर्शद खान ३/३९, पियुष चावला २/३४) पराभूत वि. मुंबई इंडियन्स १९.३ षटकांत ४ बाद २१४ धावा (कॅमेरून ग्रीन ४४, सूर्यकुमार यादव ५५, तिलक वर्मा नाबाद २९, टीम डेव्हिड नाबाद ४५, रविचंद्रन अश्‍विन २/२७).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याचा कोल्हापुरात उन्माद २५ हून अधिक वाहने फोडली; तलवारी, एडके घेऊन केली दहशत

CM Gram Sadak Yojana: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ग्रामीण रस्त्यांसाठी ६,४२९ कोटींचा निधी; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

Monsoon Update : मान्सून पुन्हा लांबणीवर...महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? मॉन्सूनची प्रगती का रखडली? जाणून घ्या

Farmer Loan Waiver: कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा मिळणार लाभ; मात्र काय आहेत योजनेचे प्रमुख निकष-अटी

खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार, ८ ते १० राउंड फायर; सुरक्षा रक्षक जखमी, कुणी केला हल्ला?

SCROLL FOR NEXT