Sunrisers Hyderabad esakal
IPL

IPL News : पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यात अपयश!

लाराची हैदराबादच्या फलंदाजांवर टीका

सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद : सनरायझर्स हैदराबादला सोमवारी झालेल्या आयपीएल लढतीत दिल्ली कॅपिटल्सकडून सात धावांनी पराभव पत्करावा लागला. १४५ या माफक धावांचा पाठलाग करणे सनरायझर्स हैदराबादला डोईजड गेले. या पराभवानंतर निराश झालेला सनरायझर्स हैदराबादचा मुख्य प्रशिक्षक ब्रायन लारा याने फलंदाजांवर टीका केली. हैदराबादच्या फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करायला हवी, असे स्पष्ट अन्‌ परखड मत त्याने व्यक्त केले.

लारा पुढे म्हणाला, हैदराबादच्या गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली होती. फलंदाजांना जबाबदारी ओळखून खेळ करता आला नाही. खरेतर १४५ धावांचे आव्हान अगदी आरामात करायला हवे होते, असे त्याला वाटते.

हैदराबादच्या या पराभवानंतर लाराने खेळपट्टीलाही दोष दिला नाही. तो म्हणाला, खेळपट्टी व्हीलन नव्हती. आमच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करायला हवा होता. पॉवरप्लेमध्येही संथ फलंदाजी केली.

मधल्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना विकेट मिळाले. याचा फायदा त्यांना झाला. तसेच अखेरच्या षटकांमध्ये इशांत शर्मा, मुकेश व ॲनरीक नॉर्खिया या व्यावसायिक गोलंदाजांनी अव्वल दर्जाची कामगिरी केली, असे लारा स्पष्ट सांगतो.

दिल्लीचा डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याप्रसंगी म्हणाला, पहिल्या पाच लढतींमध्ये आमचा पराभव झाला. पण मागील दोन लढतींमध्ये आम्ही विजय मिळवला आहे. असे कुलदीप आवर्जून म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dasara 2025: कंबरेला दोरी बांधून ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या बारा बैलगाड्या; बिरोबाचा पारंपारिक दसरा महोत्सव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

Video: रावणाची दहा डोकी घेऊन फिरत होती राखी सावंत, अशाच अवतारात छम्मक छल्लो गाण्यावर नाच नाच नाचली, व्हिडिओ बघून तुम्ही पण हसाल

Mysore Dasara History : 100 वर्षांपूर्वी म्हैसूरच्या राजवाड्यात कसा साजरा व्हायचा शाही दसरा? हैदर अली, टिपू सुलतानचा उदय झाला अन्...

SCROLL FOR NEXT