Gautam Gambhir on Virat Kohli sakal
IPL

IPL News : कोहली-गंभीर भिडले : दोघांवरही प्रशासनची दंडात्मक कारवाई

आयपीएलमध्ये पुन्हा बाचाबाची, हमरातुमरी

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : खेळाडूंनी मैदानावरच भिडण्याची आयपीएलमधील परंपरा यंदाही कायम राहिली. त्यातच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील कायमच धुसमुसत असलेला वाद पुन्हा एकदा मैदानात दिसून आला. हाणामारी होण्याचीच परिस्थिती निर्माण झाली होती. आयपीएल प्रशासनाने याची गंभीर दखल घेत विराट आणि गंभीर यांना सामना मानधनाची सर्व रक्कम कापून घेण्याची शिक्षा केली; तर लखनौ संघाचा खेळाडू अफगाणिस्तानचा नवीन उल हक याच्यावरही दंडाची कारवाई करण्यात आली.

अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर सोमवारी झालेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि लखनौ सुपर जायंटस सामना वेगळ्याच कारणासाठी गाजला. गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात बंगळूरने १८ धावांनी विजय मिळवला आणि या दोन संघांत झालेल्या अगोदरच्या लढतीतील पराभवाची परतफेड केली. सामना संपल्यानंतर विराट आणि गंभीर एकमेकांना भिडले. त्यांच्यात फार मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमक उडत होती.

वादाची ठिणगी १० एप्रिल रोजी

बंगळूर आणि लखनौ यांच्यात बंगळूर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला सामना लखनौने एका धावेने जिंकला होता. त्या सामन्यानंतर गंभीर याने बंगळूरच्या पाठीराख्यांना उद्देशून केलेले वर्तन, अखेरची धाव घेणाऱ्या आवेश खान याने आपटलेले हेल्मेट, असे प्रकार घडले होते, त्यामुळे सोमवारी झालेल्या सामन्यात त्या लढतीचे पडसाद उमटणार हे उघड होते.

विराटचा अतिआक्रमकपण

१० एप्रिल रोजी झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याच्या उद्देशाचेच वर्तन विराट कोहलीकडून सोमवारच्या लढतीत दिसून येत होते. लखनौ संघाचा एकेक फलंदाज जसा बाद होत होता, तसतसा विराट कोहली रागारागाने जल्लोष करत होता. त्यामुळे सामना संपल्यानंतर वादाची ठिकणी पडणार याचे संकेत मिळत होते. लखनौ संघातील फलंदाज अफगाणिस्तानचा नवीन उल हक हा तर मैदानावर विराट कोहलीला खुन्नस देत होता.

सामना संपल्यानंतर दोन्ही संघांतील सर्व खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात. सोमवारीही तणावपूर्ण वातावरणात खेळाडू आमनेसामने आले त्याच वेळी नवीन उल हकने विराटबरोबर हस्तांदोन केले नाहीच, पण या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. एकमेकांच्या अंगावर जाणार असे वाटत असतानाच बंगळूरचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने या दोघांना बाजूला केले.हे सर्व एकीकडे घडत असताना गंभीर तावातावाने विराटकडे जात होता. लखनौचा कर्णधार केएल राहुलला परिस्थितीची जाणीव झाली आणि तो गंभीरला रोखण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चिडलेल्या गंभीरने विराटला गाठलेच आणि मोठी शाब्दिक चकमक सुरू झाली.

दोन्ही संघांतील खेळाडू या दोघांना बाजूला करत होते. विराट कोहली गंभीरच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत होते, परंतु बाचाबाची वाढत गेली. त्या वेळी बंगळूरचा कर्णधार फाफ डुप्लेसी, लखनौचा सहायक प्रशिक्षक विजय दहिया, बुजुर्ग खेळाडू अमित मिश्रा दोघांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेनंतर विराट कोहली लखनौचा कर्णधार राहुलसह बोलताना दिसून आला.

दोघेही दिल्लीतील खेळाडू

गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील वाद जगजाहीर आहे. विशेष म्हणजे ते दोघेही दिल्ली या एकाच राज्यातील खेळाडू आहेत, देशांतर्गत क्रिकेट ते एकत्रितपणे खेळलेले आहेत.

१० वर्षांपासूनचा वाद

गंभीर आणि विराट यांच्यातील हा वाद यंदाच्या स्पर्धेतून निर्माण झाला नाही, तर १० वर्षांपूर्वीही हे दोघेही खेळाडू भरमैदानात असेच एकमेकांना भिडले होते.

कोणाला किती दंड

  • विराट कोहली (१०० %

  • सामना मानधन) १.०७ कोटी

  • गौतम गंभीर (१०० %

  • सामना मानधन) २५ लाख

  • नवीन उल हक (५०%

  • सामना मानधन) १.७९ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT