IPL Points Table 2023  
IPL

IPL 2023: केकेआरची टेबलमध्ये मोठी झेप, गतविजेत्या गुजरातला धक्का

कोलकाता नाईट रायडर्सने रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला अन्...

Kiran Mahanavar

IPL Points Table 2023 : आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 14 सामने खेळले गेले आहेत. रविवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादने विजय मिळवला. त्याचवेळी गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जला पहिला पराभव पत्करावा लागला.

पॉइंट टेबलवर नजर टाकली तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा संघ 4 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. 6 संघांचे समान 4-4 गुण आहेत, परंतु उत्तम धावगतीमुळे राजस्थानचा संघ क्रमांक-1 वर कायम आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला. संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. या संघाचे 3 सामन्यांत 4 गुण झाले असून त्यांनी गुणतालिकेत क्रमांक-2 वर मोठी झेप घेतली आहे. लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जचेही 3-3 सामन्यांत 4-4 गुण आहेत. मात्र रनरेटमुळे लखनौ तिसऱ्या, गुजरात चौथ्या, सीएसके पाचव्या आणि शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आतापर्यंत 2 पैकी एक सामना जिंकला आहे तर सनरायझर्स हैदराबादने 3 पैकी एक सामना जिंकला आहे. दोन्ही संघांचे २-२ गुण आहेत. आरसीबी गुणतालिकेत 7व्या तर हैदराबादचा संघ 8व्या क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. मुंबईने 2 आणि दिल्लीला 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम मुंबई गुणतालिकेत 9व्या तर दिल्लीचा संघ सर्वात कमी 10व्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताकडून अंडर १९ वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

Ganesh Kale Murder: गणेश काळेला मारेकऱ्यांनी का निवडलं? मोठं कारण उघडकीस; टोळीयुद्धाला आणखी पेट?

शाहरुख खान कधीच काश्मीरला का गेला नाही? वडील ठरले कारण, म्हणाला, 'त्यांनी सांगितलेलं की बेटा तू...

Women's World Cup: भारत-द. आफ्रिका पहिल्या विजेतेपदासाठी भिडणार, पण पाऊस घालणार खोडा? रिझर्व्ह डे असणार की नाही? जाणून घ्या

Sunday Special Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा बनाना चॉकलेट केक, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT