IPL Records KL Rahul Century Virat Kohli
IPL Records KL Rahul Century Virat Kohli esakal
IPL

राहुल 'खास' क्लबमध्ये झाला सामील; विराट 'विक्रम' मात्र अजून दूरच

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयपीएलच्या 26 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंटने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभवाची धूळ चारली. या सामन्यात लखनौ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) दमदार शतक ठोकले. त्याने लखनौच्या डावाची सूत्रे एकहाती सांभाळत नाबाद 103 धावांची खेळी केली. सलामीला आलेला राहुल 20 व्या षटकापर्यंत खेळत राहिला. त्याला मनिष पांडे (38) आणि क्विंटन डिकॉकने (24) यांनीही त्याला चांगली साथ दिली. मात्र लखनौच्या 199 धावांमध्ये एकट्या राहुलचा वाटा 103 धावांचा होता. विशेष म्हणजे राहुलने आयपीएलमधील आपले तिसरे शतक ठोकले. आजच्या शतकामुळे केएल राहुल हा एका खास क्लबमध्ये दाखल झाला आहे.

केएल राहुलने मुंबई इंडियन्सविरूद्ध शतक ठोकत एका संघाविरूद्ध दोन शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत आपले नाव कोरले. विशेष म्हणजे केएल राहुल या यादीतला फक्त चौथा फलंदाज आहे. यापूर्वी ख्रिस गेलने पंजाब विरूद्ध दोन, विराट कोहलीने (Virat Kohli) गुजरात लायन्स विरूद्ध 2 तर डेव्हिड वॉर्नरने केकेआर विरूद्ध 2 शतके ठोकली आहे. विशेष म्हणजे केएल राहुलचे हे अवघे तिसरे आयपीएल शतक आहे. त्यातील दोन शतके ही मुंबई इंडियन्सविरूद्ध ठोकली आहेत.

याचबरोबर केएल राहुलने कर्णधार म्हणून आयपीएलमधील आपले दुसरे शतक ठोकले. विराटनंतर आयपीएलमध्ये दोन शतके ठोकणारा केएल राहुल हा दुसरा कर्णधार ठरला आहे. मात्र विराट कोहलीचे रेकॉर्ड मोडण्यासाठी अजून त्याला मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. विराट कोहलीने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये पाच शतके ठोकली आहेत. राहुलचा जिगरी यार विराट कोहलीला मागे टाकण्यासाठी राहुलला अजून तीन शतके ठोकावी लागणार आहेत. याचबरोबर विराटच्या विक्रमाआधी केएल राहुलला शेन वॉट्सन (4) आणि डेव्हिड वॉर्नर (4) यांना मागे टाकावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT