Tilak Varma | Mumbai Indians Sakal
IPL

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

Tilak Varma Fifty: तिलक वर्माने आयपीएलमध्ये जेव्हा अर्धशतक केले आहे, तेव्हा मुंबई इंडियन्ससाठी निकाल काय लागलाय जाणून घ्या.

Pranali Kodre

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 43 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात शनिवारी (27 एप्रिल) खेळवला गेला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने 10 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात तिलक वर्माने 32 चेंडूत 63 धावांची अर्धशतकी खेळी करत मुंबई संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तो शेवटच्या षटकात बाद झाला आणि नंतर मुंबई संघही पराभूत झाला.

दरम्यान, तिलकने अर्धशतक केल्यानंतकही मुंबई इंडियन्स संघ पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. खरंतर जेव्हा जेव्हा आयपीएलमध्ये तिलकने अर्धशतक झळकावलं आहे, तेव्हा तेव्हा मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

शनिवारी तिलकने आयपीएलमध्ये अर्धशतक करण्याची ही सहावी वेळ होती. लक्षात घेण्यासारखी गोष्ट त्याने अर्धशतक केलेल्या सहाही सामन्यात मुंबईने पराभव स्विकारला आहे.

तिलकने आयपीएल 2022 मध्ये दोन, आयपीएल 2023 मध्ये एक आणि आयपीएल 2024 मध्ये आत्तापर्यंत तीन अर्धशतके केली आहेत. पण त्याने केलेल्या या सर्व सामन्यात मुंबईचा पराभव झालाय.

तिलक वर्माची 6 अर्धशतके

तिलकने लखनौपूर्वी आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघांविरुद्ध झालेल्या सामन्यातही अर्धशतक केले होते, पण या सामन्यांमध्येही मुंबईला विजय मिळवता आला नाही.

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 27 मार्च 2024 रोजी झालेल्या सामन्यात तिलकने 64 धावांची खेळी केलेली. पण मुंबईला 31 धावांची पराभूत व्हावे लागले. याशिवाय 22 एप्रिल 2024 रोजी राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 65 धावांची खेळी केली होती, पण मुंबईला 9 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.

त्याचबरोबर तिलकने 2022 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करताना दोन अर्धशतकं केली होती. त्याने 2 एप्रिल 2022 रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात 61 धावांची खेळी केली होती, पण त्या सामन्यात मुंबईला 23 धावांनी पराभूत व्हावे लागले.

त्यानंतर 21 एप्रिल 2022 रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात तिलकने नाबाद 51 धावांची खेळी केली होती. त्या सामन्यातही मुंबईला 3 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते.

तसेच आयपीएल 2023 मध्ये तिलकने एकमेव अर्धशतक रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध 2 एप्रिल 2023 रोजी झालेल्या सामन्यात ठोकले होते. त्याने नाबाद 84 धावांची खेळी केलेली. परंतु त्या सामन्यातही मुंबईला 8 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT