IPL

Video: (इ) शानदार !!! किशनने SRH ला दणका देत कुटल्या ८४ धावा

विराज भागवत

राशिद खान सकट सर्व गोलंदाजांचा घेतला खरपूस समाचार

IPL 2021 MI vs SRH: गुरूवारच्या सामन्यात KKR ने राजस्थानला मोठ्या फरकाने पराभूत केले आणि मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढवलं. कोलकाताच्या बड्या विजयामुळे हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात मुंबईला कमीत कमी १७१ धावांनी विजय मिळवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने रोहित शर्माने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आणि फलंदाजी येताच इशान किशनने हैदराबादच्या गोलंदजांची धुलाई सुरू केली. तडाखेबाज ८२ धावांची खेळी करून तो माघारी परतला.

रोहित-इशान जोडीसमोर हैदराबादने फिरकीपटू मोहम्मद नबीला संधी दिली. त्याला पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत इशानने डावाची सुरूवात केली. त्यानंतर पुढच्या षटकात इशानने सिद्धार्थ कौलला सलग चार चौकार लगावले. त्यापुढे जेसन होल्डरलला एकाच षटकात २ चौकार आणि १ षटकार लगावत इशानने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. इशान अवघ्या १६ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यंदाच्या हंगामातील हे सर्वात जलद ठोकलेलं अर्धशतक ठरलं. तर IPL च्या इतिहासातील हे पाचव्या क्रमांकाचं जलद अर्धशतक ठरलं.

अर्धशतकानंतरही इशान किशनने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. राशिद खानसकट सर्व फलंदाजांचा त्याने चांगलाच समाचार घेतला. ३१ चेंडूत ८४ धावा केल्यानंतर स्वत:च्या डावाच्या ३२व्या चेंडूवर 'जम्मू एक्स्प्रेस' उमरान मलिकच्या गोलंदाजीवर इशान किशन झेलबाद झाला. इशानने तब्बल ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने आपली खेळी सजवली आणि संघाला अपेक्षित धडाकेबाज सुरूवात दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT