Ishan Sharma Gujarat Titans Vs Delhi Capitals esakal
IPL

Ishan Sharma : हार्दिकचे नाबाद अर्धशतक, तेवतियाही तापला होता मात्र इशांतने सगळ्यांना केलं गार

अनिरुद्ध संकपाळ

Ishan Sharma Gujarat Titans Vs Delhi Capitals : यंदाच्या आयपीएलमध्ये जे आता संपल्यात जमा होते असे अनेक खेळाडू चमकले. आज नंबर होता तो इशांत शर्माचा! त्याने शेवटच्या षटकात फक्त 12 धावा वाचवायच्या असताना, समोर हार्दिक आणि राहुल तेवतिया अशातना भन्नाट गोलंदाजी करत फक्त 6 धावा देत एक विकेट घेत दिल्लीचा विजय साकार करून दाखवला. इशांतने 4 षटकात 23 धावात 2 विकेट्स घेतल्या. दिल्ली कॅपिटल्सने गुजरातचा 5 धावांनी पराभव करत आपला तिसरा विजय मिळवला. गुजरातकडून हार्दिक पांड्याने नाबाद 59 धावा केल्या तर राहुल तेवतियाने 7 चेंडूत 20 धावा चोपून दिल्लीचे टेन्शन वाढवले होते.

गुजरातने दिल्लीला 130 धावांमध्ये गुडाळले खरे मात्र दिल्लीने देखील झुंजारपणा दाखवत गुजरातची हवा टाईट केली होती. त्यांनी गुजरातची अवस्था 3 बाद 26 धावा अशी करून ठेवली होती. खलील अहदमने वृद्धीमान साहाला शुन्यावर नॉर्त्जेने शुभमन गिलला 6 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या विजय शंकरचा इशांत शर्माने 6 धावांवर असताना त्रिफळा उडवला. यानंतर डेव्हिड मिलरही भोपळाही न फोडता माघारी परतला. त्याचा कुलदीप यादवने त्रिफळा उडवत गुजरातची अवस्था 4 बाद 32 धावा अशी अवस्था केली.

मात्र यानंतर हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर यांनी पाचव्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी रचली. गुजरात शंभरीच्या जवळ पोहचला असतानाच खलीलने अभिनव मनोहरने 26 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. दरम्यान, एक बाजू लावून धरलेल्या हार्दिक पांड्याने अर्धशतक ठोकले होते.

त्याच्या जोडीला आता राहुल तेवतिया आला होता. मात्र गुजरातला 12 चेंडूत 33 धावांची गरज होती. सामना तसा अवघड होता. मात्र आईस मॅन राहुल तेवतियाने 19 वे षटक टाकणाऱ्या नॉर्त्जेच्या शेवटच्या तीन षटकात तीन षटकार ठोकले. या षटकात तब्बल 21 धावा झाल्या. आता सामना 6 चेंडू आणि 12 धावा असा आली होता.

अनुभवी इशांत शर्माने शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याने पहिल्या चेंडूवर 2 दुसऱ्या चेंडूवर 1 धाव दिली. तिसरा चेंडू निर्धाव टाकला. तर चौथ्या चेंडूवर राहुल तेवतियाला बाद केले. आता सामना 2 चेंडूत 9 धावा असा आला. मात्र इशांतने पाचव्या चेंडूवर 2 धावा दिल्या. आता 1 चेंडू आणि 7 धावा असे इक्वेशन आले होते. राशिद खान स्ट्राईकवर होता. मात्र राशिदला फक्त दोन धावा करता आल्या आणि इशांतने दिल्लीचा विजय साकार केला.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT