Jason Roy Fined
Jason Roy Fined sakal
IPL

IPL 2023 : 4 चौकार ... 5 षटकार... तुफानी खेळीनंतर जेसन रॉयला BCCIने ठोकला दंड; बालिश कृत्यासाठी झाली शिक्षा

Kiran Mahanavar

IPL 2023 Jason Roy Fined : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध धुमाकूळ घालणारा कोलकाता नाइट रायडर्सचा सलामीवीर जेसन रॉय याला शिक्षा झाली आहे. आयपीएल 2023 च्या 36 व्या सामन्यात रॉयने 29 चेंडूत 56 धावा ठोकल्या. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 5 षटकार मारले.

इंग्लिश फलंदाज रॉयने शाहबाज अहमदच्या षटकात 4 षटकार ठोकत कोलकात्याच्या विजयाची कहाणी लिहिली. मात्र केकेआरच्या विजयानंतर त्याला शिक्षाही झाली. त्यांचे लाखोंचे नुकसान झाले. केकेआरचा 8 सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे, तर बंगळुरूचा 8 सामन्यांमधला चौथा पराभव आहे.

आयपीएलचे नियम मोडल्याबद्दल रॉय दोषी आढळला आणि त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याने आयपीएल आचारसंहितेच्या 2.2 च्या लेव्हल 1 चा गुन्हा देखील स्वीकारला आहे.

10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजयकुमार वैशाखने रॉयला बोल्ड केले, त्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना रॉयने आपला राग दाखवत बॅट हवेत फेकली. त्यांच्या या वागण्यावर बरीच टीकाही झाली होती.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना रॉयचे अर्धशतक आणि कर्णधार नितीश राणाच्या 48 धावांच्या खेळीच्या जोरावर केकेआरने 20 षटकात 5 गडी गमावून 200 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूला 8 विकेट्सवर 179 धावाच करता आल्या. फलंदाजांपाठोपाठ केकेआरच्या गोलंदाजांनीही गर्जना केली. वरुण चक्रवर्तीने 3 तर सुयश शर्मा आणि आंद्रे रसेलने 2-2 बळी घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: संतापजनक! पोर्शे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना धमक्या; पोलीस आयुक्तांनी घेतली दखल

Maharashtra Board 12th Result 2024 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Latest Marathi News Live Update: मुंबईतल्या संथ मतदानाच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

Mumbai Election: मतदानादिवशी ढिसाळ कारभार, सरकारकडून गंभीर दखल; मुख्यमंत्री शिंदेंकडून चौकशीचे आदेश

Kyrgyzstan Violence : किर्गिस्थान हिंसाचार! संभाजीनगर, धाराशिव, बीडचे ५०० विद्यार्थी अडकले; होणार ऑनलाईन परीक्षा

SCROLL FOR NEXT