Jasprit Bumrah Fan Video X/mipaltan
IPL

Jasprit Bumrah: मोठ्या मनाचा बुमराह! मुंबई हरली, पण छोट्या फॅनला असं केलं भलतंच खूश, पाहा Video

Jasprit Bumrah Fan Video: लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतरही मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने एका छोट्या फॅनला अविस्मरणीय अशी भेट दिली आहे.

Pranali Kodre

Jasprit Bumrah Fan Video: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 48 वा सामना मंगळवारी (30 एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. या सामन्यात लखनौने 4 विकेट्सने विजय मिळवला. मात्र मुंबईचा हा 7 वा पराभव ठरला आहे.

असे असले तरी या सामन्यात मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा एक छोटा फॅन मात्र भलताच खूश झाला, त्याला कारणही तसेच ठरले. त्या छोट्या फॅनला बुमराहकडून एक अनमोल भेट मिळाली.

झालं असं की एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यानंतर बुमराहने स्टँडमधून त्याचा ऑटोग्राफ मागणाऱ्या एका लहान मुलाला पाहिलं आणि डोक्यावरील पर्पल कॅप काढून लगेचच त्याला दिली. इतकंच नाही, तर त्याला ऑटोग्राफही दिला.

यानंतर तो चाहता इतका आनंदित झाला की तो पळत अत्यंत आनंदाने उड्या मारत निघून गेला. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्याप्रमाणात पसंती मिळत आहे. तसेच बुमरागचंही कौतुक होत आहे.

विशेष कौतुक यासाठी होत आहे की आयपीएलमध्ये पर्पल कॅप त्या खेळाडूच्या डोक्यावर असते, ज्याने हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे यंदा बुमराहने १० सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या असल्याने तो हंगामातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्यामुळे सध्या पर्पल कॅप त्याच्याकडे आहे.

दरम्यान, बुमराहकडे जरी पर्पल कॅप असली, तरी त्याचा संघ मुंबई इंडियन्सची कामगिरी मात्र फारशी चांगली झालेली नाही. मुंबईला 10 सामन्यांपैकी 7 सामन्यांत पराभव स्विकारावा लागला असून केवळ ३ सामन्यातच विजय मिळवता आला आहे.

मंगळवारीही झालेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 144 धावा केल्या होत्या. मुंबईकडून नेहल वढेराने सर्वाधिक 46 धावा केल्या होत्या. तसेच टीम डेव्हिडने 35 धावा केल्या होत्या. लखनौकडून मोहसिन खानने 2 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग लखनौने 19.2 षटकात 6 विकेट्स गमावत पूर्ण केला. लखनौकडून मार्कस स्टॉयनिसने आक्रमक 62 धावांची अर्धशतकी खेळ केली. मुंबईकडून 2 विकेट्स कर्णधार हार्दिक पांड्याने घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply Update : पुणेकरांना दिलासा ! पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले; खडकवासला धरणात समाधानकारक साठा

भाईजान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? सलमान खानने विकली वांद्र्यातील प्रॉपर्टी, कोट्यवधींची डील

Latest Marathi News Update : पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

Pune Rainfall : पुण्यावर वरुणराजाची कृपेची सावली! मुळशी, पवना, खडकवासल्यात मागील वर्षापेक्षा अधिक पाऊस; धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही समाधानकारक पर्जन्यमान, ताजी आकडेवारी समोर

डोक्यावरील 'पुरळ' आणि कायमचे टक्कल? सामान्य मुरुम म्हणून दुर्लक्ष पडेल महाग; तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा!

SCROLL FOR NEXT