Joe Root IPL Debut  esakal
IPL

Joe Root IPL Debut : 18000 धावा करणाऱ्या इंग्लिश फलंदाजाला अखेर राजस्थानने उतरवले मैदानात

अनिरुद्ध संकपाळ

Joe Root IPL Debut : आयपीएलच्या 52 व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स गुणतालिकेतील तळातील संघ सनराईजर्स हैदराबादशी भिडत आहे. विशेष म्हणजे आजच्या सामन्यात राजस्थान रॉयर्सकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास 18000 पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज आयपीएल पदार्पण करणार आहे. हो इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने जरी आंतरराष्ट्रीय स्तरावर 18 हजार धावा केल्या असल्या तरी त्याला यंदाच्या हंगामात आयपीएल पदार्पण करण्यासाठी 52 वा सामना उजाडावा लागला.

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2023 च्या लिलावात जो रूटला 1 कोटी रूपयाला आपल्या संघात घेतले होते. सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असे नावलौकिक असलेल्या जो रूटला आपले आयपीएल पदार्पण करण्याची संधी 10 सामन्यानंतर मिळत आहे. रूट आयपीएलमध्ये पहिल्यांदाच मैदानावर खेळताना दिसेल. हा धक्का संजू सॅमसनने दिला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानाची स्टार सलामीवीर जोडी यशस्वी जैसवाल आणि जॉस बटलर यांनी धडाकेबाज सुरूवात केली. या दोघांनी पाचव्या षटकातच राजस्थानचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्को येनसेनने 18 चेंडूत 35 धावा ठोकणाऱ्या यशस्वी जैसवालला बाद केले.

यशस्वी बाद झाल्यानंतर आलेल्या संजू सॅमसनने देखील आक्रमक फलंदाजी करण्यास सूरवात केली. त्याला जॉस बटलर बॉल टू रन करत साथ देत होता. या दोघांनी 9 षटकात राजस्थानला 95 धावा करून दिल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT