Jofra Archer Rulled Out IPL 2023
Jofra Archer Rulled Out IPL 2023 
IPL

Jofra Archer : RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई पलटणला मोठा धक्का! जोफ्रा आर्चर IPL 2023 मधून बाहेर

Kiran Mahanavar

Jofra Archer Rulled Out IPL 2023 : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र त्याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे.

जोफ्रा आर्चर आयपीएल मधून बाहेर गेला आहे. मुंबईला आधीच वेगवान गोलंदाजांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. जोफ्रा आर्चरला या लीगमधील संपूर्ण सामनेही खेळता आले नाही आणि आता आर्चरऐवजी मुंबईने ख्रिस जॉर्डनचा संघात समावेश केला आहे.

मुंबईचे उर्वरित 4 सामने अत्यंत महत्त्वाचे असून त्याला संघातून वगळणे हा मुंबईसाठी मोठा धक्का आहे. मुंबई इंडियन्सचा सामना आरसीबी (MI vs RCB) सोबत आज म्हणजेच मंगळवारी होणार आहे आणि या मोठ्या सामन्यापूर्वी आर्चरचा बाहेर पडणे हा संघासाठी मोठा धक्का आहे.

आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या मिनी लिलावात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला 8 कोटी रुपयांना आपल्या संघात समाविष्ट केले. पण दुखापतीनंतर पुनरागमन करणारा आर्चर संपूर्ण मोसमात लयीत दिसला नाही आणि केवळ 5 सामने खेळू शकला.

तो या मोसमात पुढे खेळू शकणार नाही आणि पुनर्वसनासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. आर्चरच्या जागी त्याच्या संघातील खेळाडू म्हणजेच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनचा आर्चरच्या जागी समावेश करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला 5 सामन्यात फक्त 2 विकेट घेता आल्या. त्याने 9.50 च्या इकॉनॉमीसह धावा दिल्या. त्याचवेळी त्याच्या जागी सामील होत असलेल्या ख्रिस जॉर्डनने आतापर्यंत आयपीएलमध्ये 28 सामने खेळले असून या कालावधीत त्याने 27 विकेट घेतल्या आहेत. जॉर्डनने 9.32 च्या इकॉनॉमीसह धावा दिल्या आहेत. आता या मोसमात जॉर्डनला संधी मिळणार की नाही हे पाहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: भारतातील न्यायालये लोकशाहीच्या चर्चेचे ठिकाण; ब्राझीलमधील J20 परिषदेत डी वाय चंद्रचूड यांचे स्पष्टीकरण

Bank Fraud: कोण आहे धीरज वाधवान? ज्याने विजय मल्ल्या अन् नीरव मोदीपेक्षाही केलाय मोठा स्कॅम

Amit Shah: POK भारताचे आहे अन् आम्ही ते परत घेऊ; अमित शाह यांचा इशारा

Pune Loksabha: धंगेकर की मोहोळ? कँटोन्मेंटमधील 'हे' गणित ठरवणार कोणत्या उमेदवाराला मिळणार आघाडी

Panchayat 3 : वेळेआधीच पंचायत 3 चा ट्रेलर प्रदर्शित; पुन्हा एकदा रंगणार गावकरी आणि सचिवाची जुगलबंदी

SCROLL FOR NEXT