Juhi Chawla Wrote for Cricket Lover Daughter Jhanvi Mehta an Instagram post esakal
IPL

क्रिकेटवेड्या जान्हवीसाठी आई जुहीची भली मोठी पोस्ट!

'जान्हवीला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मात्र ती योग्य मार्गावर आहे.'

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएलच्या मेगा लिलावात कोलकाता नाईट रायडर्सची (Kolkata Knight Riders) पुढची पिढी भाग घेताना दिसली. केकेआरची सहमालक असलेल्या अभिनेत्री जुही चावलाची (Juhi Chawla) मुलगी जान्हवी मेहता (Jhanvi Mehta) आणि शाहरूख खानची दोन्ही मुलं आर्यन (Aryan Khan) आणि सुहाना (Suhana Khan) लिलाव प्रक्रियेत दोन्ही दिवस सहभागी होते. दरम्यान, 20 वर्षाची जान्हवी लिलावात आर्यन आणि सुहानापेक्षा जास्त सक्रिय होती. जान्हवी तिसऱ्यांना लिलावात सहभागी झाली होती. 17 व्या वर्षी पहिल्यांदा लिलावात भाग घेणाऱ्या जान्हवीसाठी तिची आई जुही जावलाने आपल्या लाडक्या मुलीसाठी एक भली मोठी भावनिक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे.

जुही चावला जान्हवीसाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणते की, 'जान्हवी छोटी असल्यापासून फक्त आयपीएल (IPL) बघत नव्हती. तर ती प्रत्येक प्रकारचे क्रिकेट बघायची. ती समालोचनही गांभिर्यांने ऐकायची. ती खेळातील बारकावे समजून घेत होती. ती ज्यावेळी 12 वर्षाची होती. त्यावेळी आम्ही सुट्टीवर गेलो होतो. त्या हॉटेलमध्ये क्रिकेटवरील (Cricket) अनके पुस्तके होती. ती जान्हवी स्विमिंग पूलच्या काठावर बसून वाचत होती. जसजशी ती मोठी होत गेली तसतशी तिचा क्रिकेटमधील रस वाढत गेला.'

जुही जावला आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणते की, 'ज्यावेळी क्रिकेटच्या गप्पा होतात तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य उमटते. माझ्या मते तिची क्रिकेटबद्दलची माहिती चांगली आहे. आमच्या संघाचे सीईओ तिला महत्वाच्या मुद्यांवरील चर्चेत सामील करून घेतात याबद्दल त्यांचे आभार. एक आई म्हणून मी खूप आनंदी आहे. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. ती खूप हुशार आहे. तिला अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे. देवाच्या कृपेने ती योग्य मार्गावर आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Devang Dave: कोण आहेत देवांग दवे? विजय वडेट्टीवारांनी काय आरोप केले? निवडणूकीपूर्वी भाजप अडचणीत येणार?

Wai Voter list: 'वाईतील प्रारूप मतदार यादीत गंभीर चुका'; काँग्रेससह भाजप, राष्ट्रवादी पक्षाने घेतली हरकत..

खुनशी हसू आणि थरार ! आम्ही दोघीनंतर प्रिया-मुक्ताचा नवा सिनेमा; पोस्टर चर्चेत

Uddhav Thackeray : 'इलेक्शन ऐवजी थेट सिलेक्शन करा'! निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळावर उद्धव ठाकरे वैतागले

Man With 1638 Credit Cards: बापरे! या माणसाकडे आहेत तब्बल 1,638 क्रेडिट कार्ड्स; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालीये नोंद!

SCROLL FOR NEXT