karn sharma 4 time champion 
IPL

RCB ला ती चूक चांगलीच महागात पडली, एका मॅचसाठी धडपडत होता 'हा' खेळाडू

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल 2022 मधून बाहेर पडणारा 8 वा संघ ठरला आहे.

Kiran Mahanavar

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आयपीएल 2022 मधून बाहेर पडणारा 8 वा संघ ठरला आहे. आरसीबीने या हंगामात एकूण 16 सामने खेळले. त्यापैकी 9 जिंकले आणि 7 सामने हारले. परंतु या 16 सामन्यांमध्ये एक खेळाडू कधीच प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवला नाही. आयपीएलमध्ये हा खेळाडू संपूर्ण हंगाम बेंचवर बसून राहिला आहे.

आरसीबीने यावेळी मेगा लिलावात त्यांच्यासोबत फिरकीपटू करन शर्माला सामील करून घेतलं आहे. करन शर्मा 2009 पासून आयपीएलचा एक भाग आहे. पण या हंगामात करन शर्माला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने करन शर्माला संपूर्ण हंगामासाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले. आयपीएल मध्ये तो आतापर्यंत ज्या संघाचा भाग होता, त्या संघाने विजेतेपदावर कब्जा केला आहे.

करण शर्माने वेगवेगळ्या संघात असताना चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. करण शर्मा 2016 मध्ये हैदराबाद कडून विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2017 मध्ये करण शर्मा मुंबई संघाचा भाग झाला, आणि मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले. चेन्नई सुपर किंग्जने 2018 लिलावात विकत घेतले. चेन्नई कडून त्याने 2018 आणि 2021 ची आयपीएल ट्रॉफी जिंकल्या. आयपीएलमध्ये त्याने 68 सामन्यात 59 विकेट घेतल्या आहेत. भारतासाठी एक कसोटी, 2 वनडे आणि एक टी-20 सामना खेळला आहे.

करण शर्माच्या आयुष्य बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. 2005 मध्ये करण शर्मा रेल्वेत नोकरी करत होता. ट्रॅक दुरुस्त करणे आणि लोखंडी रॉड उचलणे हे त्याचे काम होते. पण 2014 मध्ये झालेल्या IPL सीझन 7 मध्ये हैदराबादने त्याला 3.75 कोटी रुपयांना खरेदी करून एका झटक्यात करोडपती बनवले. सप्टेंबर 2014 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Maharashtra politics: मूळ मुख्यमंत्री अमित शहा! देवेंद्र फडणवीस शॅडो CM, शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर सवाल

Shraddha Bhosale : कुटुंब मूळचे गुजरातचे, जन्म मुंबईत, शिक्षण अमेरिकेत अन् सासर कोकणात; कोण आहेत श्रद्धा सावंत भोसले? भाजपनं दिलीय उमेदवारी

‘कसाब बिर्याणी मागतोय’ हा ‘माझाच फंडा’! खासदार ॲड. उज्ज्वल निकम; प्रकट मुलाखतीत उलगडले अनेक किस्से..

Latest Marathi News Update LIVE : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज! पाटण्यात ऐतिहासिक शपथविधी सोहळा

SCROLL FOR NEXT