Kartik-Tyagi-Bumrah- Styen 
IPL

IPL 2021: 'मॅचविनर' कार्तिक त्यागीवर बुमराह, स्टेनही झाले फिदा

विराज भागवत

कार्तिकने निर्णायक शेवटच्या षटकात केवळ १ धावा देत घेतले २ बळी

IPL 2021 RR vs PBKS: IPL स्पर्धेत अनेक वेळा थरारक सामने रंगल्याचे चाहत्यांनी पाहिले आहेत. असाच एक सामना मंगळवारी पंजाब आणि राजस्थान यांच्यात रंगला. राजस्थानच्या गोलंदाजांनी पहिल्या १५ षटकात पंजाबच्या फलंदाजांकडून खूप मार खाल्ला. त्यानंतर सामना थोडासा फिरला. शेवटच्या ६ चेंडूत पंजाबला ४ धावांची गरज होती. केवळ २ गडी बाद झाले होते. त्या परिस्थितीत २० वर्षांच्या कार्तिक त्यागीला शेवटचे षटक टाकण्याची संधी मिळाली. कार्तिकने संधीचं अक्षरश: सोनं केलं. पहिल्या दोन चेंडूत त्याने केवळ १ धाव दिली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने सेट झालेल्या निकोलस पूरनला घरी पाठवलं. त्यानंतर पुढच्या तीन चेंडूत एकही धाव जाऊ न देता त्याने आणखी एक विकेटही घेतली. त्याच्या धडाकेबाज गोलंदाजीमुळे राजस्थानला चित्तथरारक विजय मिळाला.

२० वर्षीय कार्तिक त्यागीने अप्रतिम कामगिरी केली. त्याच्या थरारक षटकानंतर वेगवान गोलंदाजीचा बादशाह डेल स्टेन आणि भारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह या दोघांनीही त्याच्या गोलंदाजीचे तोंडभरून कौतुक केले. "व्वा कार्तिक, भन्नाट गोलंदाजी केलीस! इतक्या दडपणाच्या स्थितीत डोकं शांत ठेवून स्वत:च्या संघाला विजय मिळवून देणं हे अफलातून आहे. धडाकेबाज कामगिरी! मी खूपच प्रभाविच झालो", अशा शब्दात बुमराहने कार्तिकचे ट्वीटमधून कौतुक केले. तर "कार्तिकने टाकलेली लास्ट ओव्हर (शेवटचे षटक) ही धावांचा बचाव करताना एखाद्या गोलंदाजाने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीपैकी एक आहे", असे डेल स्टेन म्हणाला.

शेवटच्या षटकात सामना फिरला..

राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १८५ धावा केल्या. सलामीवीर एव्हिन लुईस (३६) आणि यशस्वी जैस्वाल (४९) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. महिपाल लॉमरॉरने तुफान फटकेबाजी करत १७ चेंडूत ४३ धावा कुटल्या. १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर राहुल (४९) आणि मयंक अग्रवाल (६७) यांनी १२० धावांची भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यावर निकोलस पूरनने (३२) फटकेबाजी केली. एडन मार्क्रमही दमदार फलंदाजी करत होता, पण शेवटच्या दोन षटकात त्याला फारशी फलंदाजी मिळाली नाही. परिणामी शेवटच्या षटकात ४ धावांची गरज असूनही पंजाबला त्या धावा जमवता आल्या नाहीत. कार्तिक त्यागीने शेवटच्या षटकात केवळ १ धाव देत राजस्थानला थरारक विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT