Kavya Maran Celebration After Sunrisers Hyderabad Book Place In IPL 2024 Final sakal
IPL

Kavya Maran Viral : फायनल गाठल्यानंतर काव्या मारनचा आनंद भिडला गगनाला! सामन्यादरम्यानचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

हैदराबाद अंतिम फेरीत पोहोचल्यावर संघ मालक काव्या मारनचा आनंद पाहण्यासारखा होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Kiran Mahanavar

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals : आयपीएलच्या विजेतेपदासाठी कोलकता आणि हैदराबाद यांच्यात रविवारी अंतिम सामना होणार आहे. याच दोन संघांत क्वॉलिफायर-१ हा सामना झाला होता. कालच्या सामन्यात हैदराबादने राजस्थानचा ३६ धावांनी पराभव केला.

हैदराबाद अंतिम फेरीत पोहोचल्यावर संघ मालक काव्या मारनचा आनंद पाहण्यासारखा होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काव्या मारन स्टँडमध्ये नाचताना दिसत आहे. तिने तिच्या उर्वरित मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी हस्तांदोलन केले आणि अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल संघाचे अभिनंदन केले.

चेन्नईच्या खेळपट्टीवर राजस्थानचे फिरकी गोलंदाज अश्विन आणि चहल प्रभावी ठरतील, असा अंदाज होता; परंतु हैदराबादचे फिरकी गोलंदाज शहाबाझ अहमद आणि बदली गोलंदाज अभिषेक शर्मा यांनी राजस्थानच्या फलंदाजांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे १७६ धावांच्या आव्हानासमोर त्यांना ७ बाद १३९ एवढ्याच धावा करता आल्या.

राजस्थानसाठी यशस्वी जयस्वाल हा भरवशाचा फलंदाज होता. त्याने २१ चेंडूंत ४२ धावांची खेळी केली; परंतु पुन्हा एकदा तो संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची गरज असताना विकेट बहाल करून बाद झाला. कर्णधार सॅमसननेही संघ अडचणीत असताना निराशा केली. रियान पराग, आर. अश्विन आणि हेटमायर एकेरी धावांत परतले. त्यामुळे राजस्थानची ६ बाद ९२ अशी अवस्था झाली. ध्रुव जुरेलने नाबाद ५६ धावा केल्या; पण त्या पराभव रोखू शकल्या नाहीत.

बोल्टचा प्रभावी मारा

राजस्थानसाठी हुकमी असलेला ट्रेंट बोल्ड पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आला. कर्णधार सॅमसनने त्याला सलग तीन षटके गोलंदाजी दिली. त्यात त्याने अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांना बाद केले. त्यामुळे हैदराबादची अवस्था ३ बाद ५७ अशी झाली होती. यातील ३७ धावा एकट्या त्रिपाठीच्या होत्या.

ही पडझड होत असताना ट्रॅव्हिस हेड केवळ नऊ चेंडूंत ७ धावाच करू शकला होता. गेल्या दोन सामन्यांत सलग शून्यावर बाद झाल्याचे दडपण त्याच्यावर होते. त्यानंतर त्याने २८ चेंडूंत ३४ धावांचे योगदान दिले. संदीप शर्माने त्याचा अडसर दूर केला.

१० षटकांत ४ बाद ९९ अशी अवस्था हैदराबादची झाली होती; पण धावांची गती चांगली असल्यामुळे दडपण थोडे कमी होते. क्लासेनने त्यांना मदतीचा हात दिला. ३४ चेंडूत त्याने ५० धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT