Kavya Maran meet Kane Williamson Sakal
IPL

SRH vs GT: सामना रद्द झाल्यानंतर काव्या मारन अन् विलियम्सनचं रियुनियन, सनरायझर्स हैदराबादन शेअर केला खास Video

Kavya Maran meet Kane Williamson: सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघातील सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतरचा केन विलियम्सन आणि काव्या मारन यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Kavya Maran meet Kane Williamson: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 66 वा सामना गुरुवारी (16 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघात सामना होणार होता. पण हैदराबादमध्ये झालेल्या पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ न होता हा सामना रद्द झाला.

दरम्यान, या सामन्यानंतर केन विलियम्सन आणि काव्या मारन यांच्या भेटीचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.

हा सामना सुरु होण्याची बराच वेळ वाट पाहण्यात आली, पण पावसाची संततधारेमुळे सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक पाँइंट्स देण्यात आला. त्यामुळे आता सनरायझर्स हैदराबादचे 15 पाँइंट्स झाले आहेत.

हैदराबादने आत्तापर्यंत 13 सामन्यांमध्ये 7 विजय आणि 5 पराभव स्विकारले आहेत. तसेच हा एक सामना अनिर्णत राहिला. यामुळे आता त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश पक्का झाला. तसेच गुजरातचे मात्र आव्हान संपलेले असल्याने त्यांचा हा यंदाच्या हंगामातील अखेरचा सामना ठरला.

दरम्यान, सामना रद्द झाल्यानंतर गुजरात टायटन्सचा फलंदाज केन विलियम्सन सनरायझर्स हैदराबादची मुख्य कार्यकारी अधिकारी काव्या मारन आणि व्यवस्थापनातील सदस्यांना जाऊन भेटला. यादरम्यान काव्या आणि विलियम्सन यांच्यात चर्चाही झाली. हा व्हिडिओ सनरायझर्स हैदराबादने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

खरंतर विलियम्सन 2015 ते 2022 पर्यंत सनरायझर्स हैदराबादकडून क्रिकेट खेळला आहे. त्याने या संघाचे नेतृत्वही केले असून 2018 साली त्याच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या अंतिम सामन्यातही प्रवेश केला होता. पण हैदराबादला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

हैदराबादच्या चाहत्यांसाठीही विलियम्सन लोकप्रिय खेळाडूंपैकी एक होता. त्याला चाहत्यांकडून केन मामा असे टोपन नावही देण्यात आले आहे. विलियम्सने हैदराबादसाठी 76 सामन्यांत 18 अर्धशतकांसह 2101 धावा केल्या आहेत.

दरम्यान, 2023 आयपीएलपूर्वी हैदराबादने विलियम्सनला करारमुक्त केले. त्यामुळे त्याला आयपीएल लिलावातून गुजरातने संघात घेतले. यामुळे आता विलियम्सन गुजरातकडून खेळताना दिसतो. पण त्याला यंदाच्या हंगामात फार खेळण्याची संधी मिळाली नाही, त्याने 2 सामनेच खेळले. पण त्याला 27 धावाच करता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT