Ambati Rayudu Sakal
IPL

Ambati Rayudu: 'तू जोकर आहेस...', IPL फायनलनंतर पीटरसनने ऑन-एअर रायुडूला का मारला टोला? Video व्हायरल

Kevin Pietersen: आयपीएल 2024 फायनलनंतर केवीन पीटरसनने ऑन-एअर अंबाती रायुडूला जोकर म्हणत त्याची खिल्ली उडवली.

Pranali Kodre

Ambati Rayudu: रविवारी (26 मे) इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 8 विकेट्सने विजय मिळवत तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.

याच सामन्यानंतर मात्र केविन पीटरसनने अंबाती रायुडूला ऑन-एअर जोकर असं गमतीने म्हटले. त्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

झाले असे की या सामन्यासाठी पीटरसनसह मॅथ्यु हेडन आणि अंबाती रायुडूही समालोचकांच्या टीममध्ये होते. सामन्याआधी रायुडूने हैदराबादच्या समर्थनार्थ नारंगी रंगाचे जॅकेट घातले होते. पण कोलकाता जिंकल्यानंतर त्यांने हे जॅकट बदलून निळ्या रंगाचे जॅकेट घातले.

त्याचमुळे त्याने त्याचे जॅकेट बदलल्याचे पाहून सामन्यानंतर पीटरसन आणि हेडन यांनी त्याची खिल्ली उडवली. यावेळी पीटरसनने त्याला जोकरही म्हटले. त्यांच्याबरोबर प्रेझेंटेटर असलेल्या मयंती लँगरने यावेळी म्हटले 'त्याने जॅकेट बदलल्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल थँक यू.'

त्याचवेळी पीटरसन म्हणाला, 'कमीत कमी मी माझ्या मतावर ठाम राहिलो. मी जे घातले, त्यावरच कायम राहिलो. तू जोकर आहेस, नेहमीच एक जोकर.'

त्यानंतर रायुडू म्हणाला, 'मी दोन्ही संघांना पाठिंबा देत होतो. मी क्रिकेटला पाठिंबा देत होतो.' नंतर रायुडू मजेने असेही म्हणाला, 'ते दादागिरी करत आहेत. ऑस्ट्रेलियन आणि इंग्लिश खेळाडूंबरोबर काम भारतीय करू शकत नाहीत.'

दरम्यान, रायुडू गेल्या काही दिवसात त्याच्या कमेंट्समुळे चर्चेत आला आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावरही टीका केली होती.

तसेच त्याने अंतिम सामन्यानंतर बंगळुरू संघावर निशाणा साधताना असेही म्हटले की ऑरेंज कॅपने आयपीएल ट्रॉफी जिंकता येत नाही. त्यासाठी संघातील सर्वांचे सहकार्य गरजेचे असते. आयपीएल 2024 मध्ये ऑरेंज कॅप विराट कोहलीने जिंकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT