Shreyas Iyer | RCB vs KKR | IPL 2024 Sakal
IPL

Shreyas Iyer Video: 'मी गोंधळलोय, मला दोन प्लेइंग इलेव्हनच्या शीट दिल्या...', टॉसवेळी KKR कॅप्टनचा सावळा गोंधळ

IPL 2024, RCB vs KKR: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध टॉस जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर गोंधळला होता.

Pranali Kodre

IPL 2024, RCB vs KKR: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाविरुद्ध 7 विकेटन्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यापूर्वी झालेल्या नाणेफेकीदरम्यान कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरचा झालेला गोंधळ चर्चेचा विषय ठरला.

झाले असे की सामन्यापूर्वी कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस नाणेफेकीसाठी आले होते. यावेळी श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी स्विकारत बेंगळुरू संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

यानंतर त्याच्या निर्णयाबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली. मात्र त्यानंतर प्लेइंग इलेव्हन सांगताना त्याचा मोठा गोंधळ झाला.

त्याने अनुकूल रॉयला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिल्याचे सांगितले, मात्र त्याला कोणाच्या जागेवर संधी दिली हे सांगायचे तो विसरला. तसेच त्याने सोबत आणलेल्या प्लेइंग इलेव्हनच्या दोन्ही शीटला पाहिले, पण तो गोंधळलेलाच दिसला.

त्यावेळी श्रेयस म्हणाला, 'आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. क्युरेटरबरोबर आमची चर्चा झाली असून तिने सांगितले की फिरकी गोलंदाजीला मदत मिळू शकते. सर्वांमध्ये उत्साह आहे. आम्हाला आमची चांगली लय कायम ठेवायची आहे. तसेच वर्तमानात राहणेही महत्त्वाचे आहे.'

'माझी भूमिका अँकर फलंदाजाची आहे. संघात चांगली गोलंदाजांची फळी असणे नेहमीच चांगले असते. गोलंदाजीबाबत सांगायचे झाले, तर अनुकूल रॉयला संधी दिली आहे. पण मी खरंच गोंधळलो आहे. मला दोन प्लेइंग इलेव्हनच्या शीट दिलेल्या आहेत.'

दरम्यान, नाणेफेकीवेळी जरी श्रेयसला गोंधळ झाला असला, तरी नंतर संघांनी सुपूर्त केलेल्या प्लेइंग इलेव्हनमधून गोंधळ दूर झाला. अनुकूल रॉयला नितीश राणाच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली. तसेच अंगक्रिश रघुवंशीला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते.

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 182 धावा केल्या. बेंगळुरूकडून विराट कोहलीने 59 चेंडूत सर्वाधिक 83 धावांची नाबाद खेळी केली. कोलकाताकडून हर्षित राणा आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कोलकाताने 17 व्या षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. कोलकाताकडून वेंकटेश अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तसेच सुनील नारायणने 47 धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने नाबाद 39 धावा केल्या.

बेंगळुरूकडून यश दयाल मयंक डागर आणि विजयकुमार वैशाख यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT