Shreyas Iyer | IPL 2024 Sakal
IPL

KKR vs RR: नाणेफेकीपूर्वीच्या 'किस'चा अय्यरला झाला नाही फायदा; सॅमसनही चकीत, पाहा VIDEO

Shreyas Iyer Video: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी नाणेफेकीवेळी केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने केलेल्या कृतीने संजू सॅमसनलाही चकीत झाला होता.

Pranali Kodre

Shreyas Iyer Video: इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत ३१ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या संघांत मंगळवारी खेळला जात आहे. ईडन गार्डन्सवर होत असलेल्या या सामन्यापूर्वी नाणेफेकीवेळी कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने केलेल्या एका कृतीने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनलाही चकीत केले.

हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर होत असल्याने सामनाधिकाऱ्यांनी नाणे श्रेयसच्या हातात दिले. यावेळी नाणे उडवण्यापूर्वी तो त्याला किस करताना दिसला, त्यानंतर त्याने ते नाणे उडवले.

दरम्यान, किस केल्यानंतरही नाणेफेकीचा निर्णय श्रेयसच्या बाजू्ने लागला नाही, राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

श्रेयसने नाणेफेकीपूर्वी त्या नाण्याला किस केल्याचे प्रेझेंटेटर संजय मांजरेकर यांनी राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला सांगितले, ते ऐकून तोही आर्श्चर्याने श्रेयसकडे पाहून हसू लागला. त्यानंतर मांजरेकरांनी याबाबत श्रेयसला विचारल्यानंतर त्याने सांगितले की ते फक्त एक फ्लाईंग किस होते.

दरम्यान, यंदाच्या आयपीएल हंगामात श्रेयस अय्यरने अशाप्रकारे नाणेफेकीवेळी नाण्याला किस करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दोनवेळा त्याने असे केले आहे. पण आधी दोन्ही वेळेस नाणेफेकीचा निकाल त्याच्या बाजूने लागला आणि सामन्याचाही निकाल त्याच्याबाजूने लागला होता.

तथापि, राजस्थानविरुद्ध नाणेफेक हरल्यानंतर श्रेयसने सांगितले की त्यालाही प्रथम गोलंदाजी करायची होती.

दरम्यान, या सामन्यासाठी कोलकाताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही, तर राजस्थान संघात या सामन्यातून जॉस बटलर आणि आर अश्विन यांचे पुनरागमन झाले आहे.

31 व्या आयपीएल सामन्यासाठी दोन्ही संघ

कोलकाता नाईट रायडर्स - फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

  • इम्पॅक्स प्लेअरसाठी पर्याय - सुयश शर्मा, अनुकूल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, वैभव अरोरा

राजस्थान रॉयल्स - यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल

  • इम्पॅक्स प्लेअरसाठी पर्याय - जोस बटलर, कोहलर-कॅडमोर, शुभम दुबे, नवदीप सैनी, नांद्रे बर्गर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT