Gautam Gambhir | KKR Sakal
IPL

Gautam Gambhir: 'स्वप्न पाहाण्याची...', KKR तिसऱ्यांदा IPL चॅम्पियन ठरल्यानंतर गंभीरच्या पोस्ट चर्चेत

Gautam Gambhir Post: कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानतंर गौतम गंभीरने दोन पोस्ट केल्या आहेत, ज्याची सध्या चर्चा होत आहे.

Pranali Kodre

Gautam Gambhir: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचे विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सने पटकावले. रविवारी चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवत तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले.

कोलकाताच्या या विजयात गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाचेही मोलाचे योगदान राहिले. गंभीरने आयपीएल 2024 साठी कोलकाता संघाचा मेंटॉर म्हणून जबाबदारी स्विकारली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी कोलकाताने 2012 आणि 2014 साली गंभीरच्याच नेतृत्वात आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते.

आता कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर गंभीरने दोन ट्वीट केले आहेत. त्याच्या ट्वीटमुळे तो चर्चेत आला आहे. कोलकाताने ट्रॉफी जिंकल्यानंतर आधी गंभीरने ट्वीट केले की “जिसकी मति और गति सत्य की हो, उसका रथ आज भी श्री कृष्ण चलाते हैं”. हे ट्वीट करण्यामागील त्याचा हेतू नक्की काय होता, यावरून अनेक चर्चा होत आहे.

तसेच नंतर गंभीरने कोलकाताच्या विजयाच्या काही क्षणांचे फोटो पोस्ट करत लिहिले की 'स्वप्न पाहण्याची हिंमत करा.'

दरम्यान, कोलकाताच्या विजयाबद्दल सांगायचे झाले, तर हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 18.3 षटकात सर्वबाद 113 धावा केल्या. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 24 धावांची खेळी केली.

कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर वैभव अरोरा, सुनील नारायण आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 114 धावांचे लक्ष्य कोलकाताने 10.3 षटकात 2 विकेट्स गमावत पूर्ण केले. कोलकाताकडून वेंकटेश अय्यरने सर्वाधिक 52 धावांची नाबाद खेळी केली, तर रेहमनुल्ला गुरबाजने 39 धावांची खेळी केली. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT