KKR Pat Cummins conceive 190 Runs
KKR Pat Cummins conceive 190 Runs  ESAKAL
IPL

केकेआरच्या 'या' स्टार बॉलरने दिल्या 16 षटकात 190 धावा; अय्यर बसवणार बेंचवर?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या 15 व्या हंगामाची विजयी सुरूवात केली होती. त्यानंतर आरसीबीकडून पराभव पत्करल्यानंतर त्यांनी सलग दोन सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. मात्र त्यानंतर झालेल्या तीनही सामन्यात केकेआरच्या पदरी निराशाच आली आहे. त्यामुळे ते 6 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहचले आहेत. केकेआरच्या खराब कामगिरीचे एक कारण त्यांची खराब गोलंदाजी आहे. त्यातल्या त्यात पॅट कमिन्सने (Pat Cummins) केलेली धावांची लयलूट केकेआरची डोकेदुखी ठरत आहे.

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स केकेआरकडून हंगामात 4 सामने खेळले आहेत. सुरूवातीच्या काही सामन्यांना तो पाकिस्तान दौऱ्यामुळे मुकला होता. त्यानंतर तो थेट केकेआरच्या संघात दाखल झाला आणि त्याने 4 सामने खेळले. या चार सामन्यात त्याने 15.5 षटके गोलंदाजी केली. त्याने 4 विकेटही घेतल्या आहेत. मात्र धावा देण्याच्या बाबतीत त्याचा हात सैल राहिला आहे. त्याने तब्बल 190 धावा दिल्या आहेत. आयपीएलमध्ये दाखल होण्यापूर्वी कमिन्सने पाकिस्तानातील लाहोर कसोटीत 8 विकेट घेतल्या होत्या.

कमिन्सने मुंबई इंडियन्स विरूद्धचा सामना खेळला. त्याने 49 धावा देत 2 विकेट मिळवल्या. मात्र फलंदाजीत 14 चेंडूत अर्धशतक ठोकत त्याने सर्वांची मने जिंकली. दिल्लीविरूद्ध त्याने 51, सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध 40 आणि राजस्थान विरूद्ध 50 धावा दिल्या होत्या. विशेष म्हणजे फलंदाजीतही कमिन्स फ्लॉप झाला आहे. त्याने अर्धशतकी खेळीनंतर 4, 3 आणि 0 धावा केल्या आहेत. राजस्थान विरूद्धच्या सामन्यात युजवेंद्र चहलने पॅट कमिन्सला बाद करत आपली हॅट्ट्रिक साजरी केली होती.

पॅट कमिन्स पहिल्या तीन सामन्यात केकेआरसाठी उपलब्ध नव्हता. यातील दोन सामन्यात केकेआरने न्यूझीलंडच्या टीम साऊदीला संघात स्थान दिली होते. केकेआरने साऊदीला (Tim Southee) त्याची बेस प्राईस 1.5 कोटी रूपयांना खरेदी केले होते. या दोन सामन्यात केकेआरसाठी 8 षटकात 56 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. दुसरीकडे 7.25 कोटी किंमतीचा पॅट कमिन्स सातत्याने फेल जात आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात संघ व्यवस्थापन टीम साऊदीला पुन्हा एकदा संधी देऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT