Rinku Singh IPL 2023  esakal
IPL

Rinku Singh IPL 2023 : वा रिंकू मानलं तुला! गरिबीतून वर आला आता गरीब क्रिकेटपटूंसाठी करणार मोठी गुंतवणूक

अनिरुद्ध संकपाळ

Rinku Singh IPL 2023 : कोलकाता नाईट रायडर्सला यंदाच्या हंगामात एक नवा स्टार खेळाडू मिळाला आहे. या स्टारचं नाव आहे रिंकू सिंह! रिंकू सिंहने गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज असताना सलग 5 षटकार मारत केकेआरला सामना जिंकून दिला होता. यानंतर सर्वत्र रिंकू सिंहची चर्चा सुरू झाली. यावेळी रिंकू सिंह कसा गरिबीतून वर येत आयपीएल सारख्या जागतिक दर्जाच्या लीगमध्ये धडाकेबाज कामगिरी करतोय अशा बातम्या येऊ लागल्या.

रिंकू सिंहचे वडील हे एलपीजी सिलेंडर घरपोच पोहचवण्याचे काम करत होते. रिंकूची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. पोटाची खळगी भरण्यासाठी रिंकूने देखील झाडू पोछा केला होता. मात्र त्याने आपले क्रिकेटचे स्वप्न कधी मरू दिले नाही. याच स्वप्नाच्या जोरावर आज रिंकू सिंग जगप्रसिद्ध झाला.

रिंकू सिंहला पहिल्यांदा पंजाब किंग्जने 2017 च्या हंगामात 10 लाख बेस प्राईसला विकत घेतले होते. पुढच्या हंगामात रिंकू सिंहने केकेआरमध्ये उडी मारली. त्याला केकेआरने 80 लाख रुपये बोली लावत आपलसं केलं. तेव्हापासून रिंकू केकेआरकडून एका पेक्षा एक भारी कामगिरी करत सामने जिंकून देत आहे.

क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता रिंकू सिंह आपल्याला सामजिक भान देखील असल्याचं दाखवून दिलं आहे. त्याने आपल्यासारख्याच गरिबीच्या गर्तेत अडकलेल्या क्रिकेटपटूंना मदतीचा हात देण्यासाठी एक मोहिम सुरू केली आहे. रिंकू सिंहने अलीगडमध्ये एक हॉस्टेल उभारण्यासाठी तब्बल 50 लाख रूपये दिले आहेत. या हॉस्टेलमध्ये गरीब क्रिकेटपटूंची अत्यंत कमी खर्चात सोय होणार आहे.

हे हॉस्टेल अलीगड क्रिकेट स्कूलच्या जागेवर उभारण्यात येणार आहे. ही 15 एकरची जागा जिल्हा क्रिकेट असोसिएशनची आहे. या हॉस्टेलमुळे क्रिकेटपटूंचा येण्या जाण्याचा वेळ वाचणार आहे. द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या या वृत्तात म्हटले आहे की, 'त्याला तरूण खेळाडूंसाठी एक हॉस्टेल बांधण्याची इच्छा होती. ज्यांची आर्थिक कुवत नाही त्यांना देखील आपली स्वप्ने पूर्ण करता यावीत यासाठी हॉस्टेल बांधायचं होतं. आती रिंकू सिंह आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला आहे. त्यानंतर आता तो आपले हॉस्टेलचे स्वप्न साकरण्यासाठी सरसावला आहे.'

ही माहिती रिंकू सिंहचे लहानपणीचे प्रशिक्षक मसूदूझ झाफर अमिनी यांनी दिली. प्रशिक्षक पुढे म्हणाले की, हे हॉस्टेल पुढच्या महिन्यापासून कार्यान्वित होईल. रिंकू मैदानावर चाहत्यांना प्रभावित करत आहेच. त्याचबरोबर त्याची मैदानाबाहेर कृती देखील सर्वांच्या स्तुतीस पात्र ठरली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Miss Universe 2025 : ज्युरीचं स्पर्धक मॉडेलशी अफेअर, जजने फायनलच्या ३ दिवस आधी दिला राजीनामा; सगळं आधीच ठरल्याचा आरोप

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

RTO Scam:'आरटीओच्या जाहिरातीतून फसवणुकीचा नवा फंडा; १९९९ रुपयात वाहन न चालवताच परवाना देण्याचे अमिष, काय आहे वास्तव..

Latest Marathi Breaking News Live Update : "कल्याण-डोंबिवलीत महापौर भाजपचाच"- नरेंद्र पवार

SCROLL FOR NEXT