KKR vs DC
KKR vs DC 
IPL

IPL 2021 : कोलकाता अभी जिंदा है! दिल्लीला शह..

सुशांत जाधव

IPL 2021 KKR vs DC : कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत प्ले ऑफमधील आपली आशा पल्लवित ठेवली आहे. शारजहाच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सने कोलकातासमोर 128 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे आव्हान कोलकाता संघाने 3 गडी राखून पार केले. या विजयासह कोलकाता संघाच्या खात्यात दोन गुण जमा झाले असून ते चौथ्या स्थानावर कायम आहे.

धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. धावफलकावर 28 धावा असताना सलामीवीर व्यंकटेश अय्यर बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेला राहुल त्रिपाठीही अवघ्या 9 धावा करुन परतला. शुभमन गिलने 30 धावा करुन मैदान सोडले. कर्णधार इयॉन मॉर्गनला खातेही उघडता आले नाही. एका बाजूने विकट पडत असताना नितेश राणाने एक बाजू सांभाळून ठेवली. दिनेश कार्तिक 12, आणि सुनील नरेन 10 चेंडूत 21 धावा करुन माघारी परतल्यानंतर साउदीच्या साथीनं राणाने संघाला विजय मिळवून दिला.

कोलकाता नाईट राडयडर्सने दमदार फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्स माफक धावात रोखले आहे. इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. प्ले ऑफमधील आपल्या आशा पल्लवित ठेवण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सला 128 धावा करायच्या आहेत. पृथ्वीच्या जागी संधी मिळालेल्या स्टिव्ह स्मिथने धवनच्या साथीनं डावाला सुरुवात केली.

शिखर धवन 24 धावा करुन परतल्यानंतर ऋषभ पंतने 39 धावांची खेळी केली. या तिघांशिवाय अन्य एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकात 9 बाद 127 धावांपर्यंत मजल मारली. कोलकाताकडून सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. टिम साउदीलाही एक विकेट मिळाली. दिल्लीने पंत आणि आवेश खानच्या रुपात दोन विकेट रनआउटच्या रुपात फेकल्या.

67-4 : अश्विनने कर्णधार इयॉन मॉर्गनला खातेही उघडू दिले नाही

67-3 : रबाडाने सलामीवीर शुभमन गिलला श्रेयस अय्यरकरवी झेल बाद केले. त्याने 33 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारासह 30 धावा केल्या

43-2 : राहुल त्रिपाठीही स्वस्तात परतला, आवेश खानने कोलकाताला दिला दुसरा धक्का

28-1 : सलामीवीर व्यंकटेश अय्यर अवघ्या 14 धावा करुन फिरला माघारी, ललित यादवला यश

कोलकातासमोर 128 धावांचे आव्हान

127-9 : आवेश खान 5 धावांवर धावबाद!

122-8 : रिषभ पंत 39 धावांवर धावबाद, करुण नायरनंचं अप्रतिम क्षेत्ररक्षण

120-7 : टिम साउदीला पहिलं यश, अश्विन नितीश राणाच्या हाती झेल देऊन 9 धावांवर झाला बाद

92-6 : अक्षर पटेलच्या रुपात व्यंकटेश अय्यरला दुसरे यश, त्याला खातेही उघडता आले नाही

89-5 : ललित यादवला नरेन याने खातेही उघडू दिले नाही

88-4 : हेटमायर अवघ्या 4 धावांची भर घालून माघारी, व्यंकटेश अय्यरला मिळाले यश

77-3 : लॉकी फर्ग्युसननं घेतली स्मिथची विकेट, दिल्लीला तिसरा धक्का

40-2 : श्रेयस अय्यर अपयशी, अवघी एक धाव करुन फिरला माघारी

35-1 : धवनच्या रुपात दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का; लॉकी फर्ग्युसनला मिळाले यश

सामन्याआधी शिखर धवन आणि हरभजन सिंग यांचा दोस्ताना पाहायला मिळाला... पाहा व्हिडिओ

कोलकाताच्या संघात कुणाला मिळाली संधी?

दिल्लीने विस्फोटक पृथ्वी शॉला आराम दिला आहे. पाहा कसा आहे दिल्लीचा संघ

कोलकाता संघाचा कर्णधार मॉर्गन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन बी काय आहे? अमित शाह काय म्हणाले जाणून घ्या...

IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT