KKR vs GT Live Score  esakal
IPL

KKR vs GT : गुजरातने कोलकात्याचे आव्हान 18 व्या षटकातच केले पार

Kiran Mahanavar

KKR vs GT : कोलकाता नाईट रायडर्सने ठेवलेले 180 धावांचे आव्हान गुजारात टायटन्सने 17.5 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यातच पार केले. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलने 49 तर विजय शंकरने आक्रमक 51 धावांची खेळी केली. त्याला डेव्हिड मिलरने 18 चेंडूत 32 धावा करत चांगली साथ दिली. केकेआरने गुजरातला त्यांच्या घरच्या मैदानावर मात दिली होती. आता त्याचा वचपा काढत गुजरातने केकेआरला त्यांच्याच घरात लाळवले. या विजयाबरोबरच गुजरातने 12 गुण घेत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

गुजरात टायटन्सने अखेर केकेआरचा वारू रोखण्यात यश मिळवले. इडन गार्डनवर नाणेफेक जिंकून त्यांनी कोलकात्याला 179 धावातच रोखले. केकेआरकडून सलामीवीर रहमनुल्ला गरबाजने 39 चेंडूत 81 धावांची तडाखेबाज खेळी केली. तर आऊट ऑफ फॉर्म असलेला आंद्रे रसेल देखील आजच्या सामन्यात फॉर्ममध्ये आला. त्याने 19 चेंडूत 34 धावांची खेळी केली. मात्र मोहम्मद शमी (3), नूर अहमद (2) आणि जोशुआ लिटिल (2) यांनी केकेआरच्या इतर फलंदाजांना जखडून ठेवले. त्यामुळे केकेआरला 200 पारचे टार्गेट ठेवता आले नाही.

179-7 (20 Ov) : आंद्रे रसेल मार रहा हैं

केकेआरचा स्टार हिटर यंदाच्या हंगामात फारशी चमक दाखवू शकला नव्हता. मात्र गुजरात विरुद्धच्या सामन्यात रसेलने आक्रमक अवतार धारण केला. त्याने 19 चेंडूत 34 धावा करत केकेआरला 20 षटकात 7 बाद 179 धावांपर्यंत पोहचवले.

135-5 : अखेर गुरजाबची खेळी आली संपुष्टात 

एका बाजूने केकेआरचे फलंदाज स्वस्तात माघारी जात असताना गुरबाजने मात्र नेटाने फलंदाजी करत रिंकू सिंह सोबत 47 धावांची भागीदारी रचत संघाला 135 धावांपर्यंत पोहचवले. मात्र गुरबाजची ही 39 चेंडूत केलेली 81 धावांची खेळी नूर अहमदने संपवली. त्यानंतर रिंकू सिंहची देखली 19 धावांवर शिकार करत केकेआरला डबल धक्का दिला.

88-4 : गुरबाजचे दमदार अर्धशतक मात्र केकेआरची टॉप ऑर्डर ढेपाळली

कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर रेहमनुल्ला गुरबाजने आक्रमक अर्धशतक ठोकले. मात्र केकेआरची वरची फळी ढेपाळली. शार्दुल ठाकूर भोपळाही न फोडता माघारी फिरला. तर व्यंकटेश अय्यर 11 आणि नितीश राणा 4 धावांवर बाद झाला.

23-1  : केकेआरला शमीने दिला पहिला धक्का

ओल्या मैदानामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. मात्र नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या गुजरातने पॉवर प्लेमध्येच केकेआरला पहिला धक्का दिला. मोहम्मद शमीने सलामीवीर जगदीशनला 19 धावांवर बाद केले.

ओल्या मैदानामुळे सामना सुरू होण्यास उशीर

पावसाची शक्यता असलेल्याने कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावरील कव्हर हटवण्यात आलेले नाही. मैदान ओलं असल्याने सामना सुरू होण्यास उशीर होत आहे.

गुजरात कोलकात्याकडून घेणार बदला! हार्दिक पांड्याने जिंकले नाणेफेक

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकात्यात पाऊस पडत आहे आणि हार्दिक पांड्याला त्याचा फायदा घ्यायचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT