Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore Playing 11  
IPL

IPL 2023 : चार वर्षांनंतर इडन गार्डन्सवर होणार IPL सामना! दुखापतींनी त्रस्त कोलकाताचा बेंगळुरूशी सामना

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत यजमानांचा ईडन गार्डन्सवर कस लागणार

सकाळ ऑनलाईन टीम

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore Playing 11 : कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर आयपीएलमधील आज होणाऱ्या लढतीत स्टार खेळाडूंनी सजलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे आव्हान असणार आहे. एकीकडे कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला सलामीच्या लढतीत पंजाब किंग्स संघाकडून पराभव पत्करावा लागला, तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने पाच वेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्सला धूळ चारली.

याच पार्श्वभूमीवर कोलकाता नाईट रायडर्स संघ आज ईडन गार्डन्स या घरच्या स्टेडियममध्ये लढत देणार आहे. याप्रसंगी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा अडथळा ओलांडून त्यांना मोसमातील पहिल्या विजयाला गवसणी घालावी लागणार आहे.

बंगळूरच्या संघातील गोलंदाजांनी सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मोहम्मद सिराज, आकाश दीप यांच्याकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. रीस टॉप्ली याला दुखापत झाल्यामुळे डेव्हिड विली याला संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. हर्षल पटेलच्या गोलंदाजीत सुधारणेची गरज आहे. तसेच मायकेल ब्रेसवेल व कर्ण शर्मा या फिरकीपटूंना शिखर धवनच्या सेनेला बांधून ठेवावे लागणार आहे.

कर्णधार फाफ ड्युप्लेसी व विराट कोहलीच्या झंझावातात मुंबई इंडियन्सचा पालापाचोळा झाला. या लढतीत दोघांनीच बंगळूरला एकतर्फी विजय मिळवून दिला. त्यामुळे बंगळूर संघातील इतर फलंदाजांना खेळपट्टीवर उभे राहून आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळाली नाही; मात्र ही स्पर्धा जवळपास दोन महिने चालू राहणार आहे. त्यामुळे दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, शाहबाज अहमद यांना फलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करावीच लागणार आहे.

अय्यर, शाकीबच्या अनुपस्थितीचा फटका

कोलकाता संघाला या वर्षी श्रेयस अय्यर व शाकीब उल हसन या दोन प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका बसण्याची शक्यता आहे. अय्यरला दुखापतीवर शस्त्रक्रियेसाठी परदेशात जावे लागणार आहे, तर शाकीब याने कौटुंबिक व आंतरराष्ट्रीय व्यग्र वेळापत्रकाचे कारण देत आयपीएलमधून माघार घेतली आहे. अय्यरऐवजी नितीश राणा याच्याकडे कोलकाता संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने दिल्लीसाठी नेतृत्व केले आहे; पण मोठ्या स्तरावर त्याच्याकडे अनुभवाची कमतरता प्रकर्षाने दिसून येते. याच कारणामुळे कोलकात्यासाठी यंदाचा मोसम खडतर असण्याची शक्यता आहे.

दोन्ही विभागात कामगिरी उंचवावी लागेल

कोलकाता संघात टीम साऊथी, उमेश यादव, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, शार्दुल ठाकूर हे स्टार गोलंदाज आहेत; मात्र पहिल्या लढतीत वरुण व उमेश यांना वगळता कुणालाही छान गोलंदाजी करता आली नाही. फलंदाजीतही रहमानुल्लाह गुरबाज, व्यंकटेश अय्यर व आंद्र रस्सेल यांनी थोडाफार झुंज दिली. एकूणच काय, तर फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात कोलकाता संघातील खेळाडूंनी कामगिरी उंचावण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT