IPL 2022 Today Match : आयपीएलमध्ये 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स दुसऱ्यांदा आमने-सामने येत आहे. दोन्ही संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहेत. याआधीच्या सामन्यात राजस्थानने कोलकातावर 7 धावांनी विजय मिळवला होता. आयपीएलमध्ये दोन्ही संघ एकूण 26 वेळा आमने सामने आले आहे.
कोलकाता आणि राजस्थान यांच्यात नेहमीच कांटे की टक्कर झाली आहे. असेच काहीसे या हंगामातील पहिल्या सामन्यातही पाहायला मिळाले आहे. जर आपण हेड टू हेड रेकॉर्डवर नजर टाकली तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 25 सामने खेळले गेले आहे, त्यापैकी 13 केकेआरने जिंकले आहेत आणि 12 रॉयल्सने जिंकले आहे. अशा स्थितीत केकेआर पुढे आहे पण सध्याच्या कामगिरीनुसार सद्या तर राजस्थान वर आहे.
पॉइंट टेबलमध्ये 9 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह राजस्थान सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर केकेआरला गेल्या पाच सामन्यांत सलग पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोलकाता 6 पराभव आणि 3 विजयानंतर 9 पैकी 6 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत आज जर संघ हरला तर त्याच्या प्लेऑफच्या आशाही जवळपास संपुष्टात येऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.