KKR vs SRH Weather Report sakal
IPL

KKR vs SRH Final IPL 2024 : फायनल सामन्यात पाऊस ठरणार व्हिलन? हवामान खात्याने दिले अपडेट

KKR vs SRH Weather Report : आयपीएल 2024 चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.

Kiran Mahanavar

KKR vs SRH Weather Report : आयपीएल 2024 चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असतील. या हंगामात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना रोमांचक सामन्याची अपेक्षा आहे. या रोमांचक सामन्यात हवामानाची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

चेन्नईत आज हवामान कसे असेल?

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ होता. केकेआरने पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.

यानंतर हैदराबादने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. या मोसमात पावसामुळे एकूण 3 सामने रद्द करण्यात आले आहेत, त्यामुळेच क्रिकेट चाहत्यांना अंतिम सामन्याबाबत हवामानाची स्थिती जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, चेन्नईमध्ये आज नक्कीच ढगाळ वातावरण असेल, परंतु पावसाची शक्यता खूपच कमी आहे. पाऊस पडणार नाही असे आपण गृहीत धरू शकतो. सामन्यादरम्यान तापमान 32 अंशांच्या आसपास असणार आहे.

या हंगामात केकेआर आणि हैदराबाद दोनदा आमनेसामने आले आहेत, विशेष म्हणजे कोलकाताने दोन्ही सामने जिंकले होते. कोलकाताने प्रथम साखळी सामन्यात हैदराबादचा पराभव केला, त्यानंतर क्वालिफायर वनमध्येही हैदराबादचा पराभव केला. अशा स्थितीत केकेआरचा फायनलसाठीचा दावाही मजबूत दिसत आहे.

दुसरीकडे, जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर तो राखीव दिवशी होईल असे मानू या. पण राखीव दिवशीही सामना झाला नाही, तर कोलकाता सामना न खेळताच ट्रॉफी जिंकेल, कारण ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर बसले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: श्री बालाजी महाराज मंदिरात विराजमान

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT