Mitchell Starc Clean Bowled Travis Head Sakal
IPL

IPL Qualifier 1: मिचेल स्टार्कची 24 कोटी वसूल करणारी कामगिरी! हेडचा त्रिफळा उडवलाच, पण KKR लाही दिली स्वप्नवत सुरुवात

Mitchell Starc Clean Bowled Travis Head: मिचेल स्टार्कने दुसऱ्याच चेंडूवर ट्रेविस हेडचा त्रिफळा उडवत केकेआरला आयपीएल क्वालिफायर सामन्यात शानदार सुरुवात दिली.

Pranali Kodre

Travis Head Wicket: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL) स्पर्धेतील क्वालिफायर वनचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळवला जात आहे. मंगळवारी (21 मे) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मिचेल स्टार्कने शानदार सुरुवात केली.

सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा सलामीला फलंदाजीला उतरले. यावेळी कोलकाताकडून 24.75 कोटी रुपये मोजत संघात घेतलेला वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क पहिल्या षटकात गोलंदाजीला उतरला.

त्याच्या पहिल्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही. परंतु दुसऱ्याच चेंडूवर त्याने हैदराबादला दणका दिला. त्याने त्याचा ऑस्ट्रेलियातील संघसहकारी असलेल्या ट्रेविस हेडचा त्रिफळा उडवला. त्याने टाकलेल्या चेंडूने मधला आणि ऑफ साईडचा स्टंप उडला. त्यामुळे हेडला सलग दुसऱ्यांदा शुन्यावर माघारी परतावे लागले.

इतकेच नाही, तर स्टार्कने 5 व्या षटकात सलग दोन चेंडूंवर हैदराबादला दोन धक्के देत कोलकाताला स्वप्नवत सुरुवात दिली. त्याने या 5 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर नितीश रेड्डीला बाद केलं. रेड्डीचा झेल यष्टीरक्षक रेहमनुल्ला गुरबाजने पकडला.

त्यानंतर पुढच्याच चेंडूवर स्टार्कने शाहबाज अहमदला त्रिफळाचीत केले. त्यामुळे ५ व्या षटकानंतर हैदराबादची अवस्था 4 बाद 39 धावा अशी झाली होती.

स्टार्कला सुरुवातीला आयपीएल खेळताना फारसा सूर गवसला नव्हता, परंतु दुसऱ्या टप्प्यात स्टार्क लयीत आला आहे.

दरम्यान, क्वालिफायर वन सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही.

क्वालिफायर वनसाठी कोलकाता-हैदराबादची प्लेइंग इलेव्हन -

कोलकाता नाईट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रुदरफोर्ड

सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल सामद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन

  • इम्पॅक्ट प्लेअरसाठी पर्याय - सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT