KL Rahul Bowled on 1st Ball Of Innings in front of Athiya Shetty
KL Rahul Bowled on 1st Ball Of Innings in front of Athiya Shetty ESAKAL
IPL

केएल राहुलची 'अ‍ॅक्शन' अथिया शेट्टीची 'रिअ‍ॅक्शन' झाली व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि लखनौ सुपर जायंट (Lucknow Super Giants) यांच्यातील सामना शेवटच्या षटकापर्यंत अत्कंठावर्धक झाला. राजस्थानचे 165 धावांचे आव्हान पार करताना लखनौ सुपर जायंटच्या तगड्या फलंदाजीला चांगलाच घाम फुटला. ट्रेंट बोल्टने तर लखनौ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुलचा (KL Rahul) पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडवत लखनौच्या मनसुब्यांना सुरूंग लागला होता. विशेष म्हणजे केएल राहुलची मैत्रिणी अथिया शेट्टी (Athiya Shetty) ही वडील सुनिल शेट्टी (Sunil Shetty) आणि आई मना देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थिती राहुलची पहिल्याच चेंडूवर दांडी उडाली.

या विकेटनंतर अथिया शेट्टी आणि सुनिल शेट्टीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. सध्या सोशल मीडियावर केएल राहुलची दांडी गुल होतानाची अ‍ॅक्शन आणि त्यावर अथिया शेट्टीची त्यानंतर आलेली रिअ‍ॅक्शन व्हायरल होत आहे. अनेक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अथिया शेट्टी ही केएल राहुलची गर्लफ्रेंड आहे आणि हे दोघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडणार आहेत. या नात्यासाठी दोन्हीकडील कुटुंबियांची कोणतीही हरकत नाहीये. त्यामुळे अथिया शेट्टी आपले वडील सुनिल शेट्टी आणि आई मना यांच्या सोबत केएल राहुलला चिअर करण्यासाठी रविवारी वानखेडेवर पोहचले होते. त्यांना राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूने त्यांची निराशा झाली.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केएल राहुल हा दुसऱ्यांदा डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे. मात्र यावेळी अथिया शेट्टी मैदानावर उपस्थित होती. तिच्या सोबत सुनिल शेट्टी देखील होता. त्यामुळे त्यांच्यासाठी हा निराश करणारा क्षण ठरला. सोशल मीडियावर देखील याबाबतचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. नेटकरण्यांनी याच्यावर चांगलेच मीम तयार करून जे व्हायरल केले. 17

राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 165 धावा केल्या होत्या. मात्र शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंटला 3 धावांनी पराभव स्विकारावा लागला. सुरुवातीच्या 15 षटकात लखनौच्या टीमचे पारडे जड होते. मात्र त्यानंतर हेटमायरने 36 चेंडूत 59 धावांची खेळी करून राजस्थानचे सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यानंतर ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात दोन विकेट घेत लखनौवर दबाव निर्माण केला. लखनौकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या मार्कस स्टॉयनिसने 17 चेंडूत 38 धावांची तुफानी खेळी केली. मात्र शेवटचे षटक टाकणाऱ्या कुलदीप सेनने 6 चेंडूत 15 धावांची गरज असताना त्याने फक्त 11 धावा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT