Venkatesh Iyer Sakal
IPL

Venkatesh Iyer: शुभमंगल सावधान! IPL संपताच KKR चा स्टार ऑलराऊंडर चढला बोहल्यावर, फोटो व्हायरल

Venkatesh Iyer Marriage: आयपीएल 2024 स्पर्धा जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार अष्टपैलू लग्नबंधनात अडकला आहे.

Pranali Kodre

Venkatesh Iyer Marriage: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धा नुकतीच संपली. 26 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजेतेपदानंतर आता लगेचच आठवड्यातच अष्टपैलू वेंकटेश अय्यर लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटोही सध्या व्हायरल होत आहेत.

वेंकटेश अय्यरने रविवारी (2 जून) पारंपारिक पद्धतीने श्रृती राघुनाथन हिच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्न समारंभासाठी कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होता.

तसेच व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये दिसते की वेंकटेश आणि श्रृती या दोघांनीही विवाहावेळी पारंपारिक दाक्षिणात्य पद्धतीचे पोषाख परिधान केले आहेत.

वेंकटेश आणि श्रृती यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपूडा केला होता. त्यानंतर आता ६ महिन्यांनी ते बोहल्यावर चढले आहेत.

वेंकटेश क्रिकेट खेळत असला, तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार श्रृतीने फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. तसेच ती सध्या बंगळुरूमध्ये नोकरी करते.

वेंकटेशबद्दल सांगायचे झाले, तर त्याने नुकतेच कोलकाता नाईट रायडर्स संघाबरोबर आयपीएल 2024 स्पर्धेच्या विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. कोलकाताला ही ट्रॉफी जिंकून देण्यात त्याचेही मोलाचे योगदान राहिले.

अंतिम सामन्यात त्याने 26 चेंडूत नाबाद 52 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याने आयपीएल 2024 मध्ये 14 सामन्यांत 158.80 च्या स्ट्राईक रेटने खेळताना 370 धावा केल्या, ज्यात त्याच्या 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

वेंकटेश भारताकडूनही 2 वनडे आणि 9 टी20 सामने खेळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT