Kolkata Knight Riders vs Gujarat Titans 35th Match Live Cricket ESAKAL
IPL

KKR vs GT : रसेल एकटाच भिडला मात्र शेवटच्या षटकात GT ची विजयी मोहर

आयपीएल 2022 च्या 35 व्या सामन्यात, केकेआर आणि गुजरात टायटन्सचा संघ आमनेसामने

सकाळ डिजिटल टीम

79-5 : डाव सावरणारा रिंकू बाद 

केकेरआरची पडझड होत असताना रिंकू सिंहने व्यंकटेश अय्यर सोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र यश दयालने रिंकू सिंहला 35 धावांवर बाद केले. त्यामुळे केकेआरचा निम्मा संघ 79 धावात माघारी गेला.

34-4 : केकेआरचा कर्णधार परतला

संघाची अवस्था 3 बाद 16 अशी झाली असताना कर्णधार श्रेयस अय्यरकडून डाव सावरण्याची अपेक्षा होती. मात्र यश दयालने त्याला 12 धावांवर बाद करत केकेआरला चौथा आणि मोठा धक्का दिला.

16-3 : लॉकी फर्ग्युसनने दिला दणका

केकेआरचे दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर नितीश राणा आणि श्रेयस अय्यरवर डाव सावरण्याची जबाबदारी होती. मात्र राणाला अवघ्या 2 धावेवर लॉकी फर्ग्युसनने बाद केले.

10-2 : सुनिल नारायणकडून निराशा

केकेआरचा धडाकेबाज फलंदाज सुनिल नारायणने फलंदाजीत पुन्हा एकदा निराशा केली. तो 5 धावा करून बाद झाला. मोहम्मद शामीने त्याला बाद केले.

5-1 : केकेआरला पहिल्याच षटकात धक्का

गुजरात टायटन्सचे 157 धावांचे आव्हान पार करताना मैदानात उतरलेल्या केकेआरला मोहम्मद शामीने पहिल्याच षटकात पहिला धक्का दिला. त्याने सॅम बिलिंग्जला 4 धावांवर बाद केले.

156-9 : आंद्रे रसेलचा एकाच षकात धमाका

  • 20 वे षटक टाकणाऱ्या आंद्रे रसेलने एकाच षटकात 4 विकेट घेत गुजरातच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर अभिनव मनोहर आणि दुसऱ्या चेंडूवर लोकी फर्ग्युसनला बाद केले. रसेलला हॅट्ट्रिकची संधी होती. मात्र तिसरा आणि चौथा चेंडूवर विकेट पडली नाही. त्यानंतर रसेलने पाचव्या चेंडूवर राहुल तेवतियाला आणि सहाव्या चेंडूवर यश दयालला बाद करत गुजरातची अवस्था 5 बाद 140 वरून 9 बाद 156 धावा अशी केली.

140-5 : राशिद खान भोपळाही न फोडता माघारी

  • टीम साऊदीने गुजरातचा पाचवा फलंदाज बाद केला. त्याने राशिद खानला भोपळाही फोडू दिला नाही.

138-4 : साऊदीने हार्दिकची खेळी संपवली

  • गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याची कॅप्टन्स इनिंग टीम साऊदीने संपवली. हार्दिक पांड्याने 49 चेंडूत 67 धावांची खेळी केली.

133-3 : डेव्हिड मिलर बाद

  • शिवम मावीने धोकादायक ठरू पाहणाऱ्या डेव्हिड मिलरला बाद करत गुजरातला तिसरा धक्का दिला.

हार्दिक पांड्याने सलग तिसरे अर्धशतक झळकावले

  • हार्दिक पांड्याने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक आहे. याआधी त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद ८७ आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाबाद ५० धावांची खेळी केली होती.

83-2 : ऋद्धिमान साहा 25 धावांवर बाद

  • 11व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर उमेश यादवने साहाला व्यंकटेश अय्यरकडे झेलबाद केले

8-1 : शुभमन गिल बाद, गुजरातला 8 धावांवर पहिला धक्का

  • टीम साऊथी पहिल्याच चेंडूवर शुबमन गिलला सॅम बिलिंग्सच्या हाती झेल देऊन गुजरातला मोठा धक्का दिला.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन)

  • रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) (विकेटकीपर), शुभमन गिल(Shubman Gill), हार्दिक पांड्या(Hardik Pandya), अभिनव मनोहर(Abhinav Manohar), डेव्हिड मिलर(David Miller), राहुल तेवतिया(Rahul Tewatia), रशीद खान(Rashid Khan), अल्झारी जोसेफ(Alzarri Joseph), लॉकी फर्ग्युसन(Lockie Ferguson), यश दयाल(Yash Dayal), मोहम्मद शमी(Mohammed Shami)

कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य इलेव्हन

  • व्यंकटेश अय्यर(Venkatesh Iyer), श्रेयस अय्यर(Shreyas Iyer), नितीश राणा(Nitish Rana), आंद्रे रसेल(Andre Russell), शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), सुनील नरेन(Sunil Narine), पॅट कमिन्स, शिवम मावी(Shivam Mavi), उमेश यादव(Umesh Yadav), वरुण चक्रवर्ती(Varun Chakaravarthy)

रसेलने गोलंदाजीत शेवटच्या ओव्हरमध्ये धमाका केला होता. मात्र फलंदाजीत तो शेवटच्या षटकात धमाका करण्यात चुकला. गुजरातने कोलकाता नाईट रायडर्सचा 8 धावांनी पराभव करत आपला सहावा विजय साजरा करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. गुजरातने केकेआर समोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र केकेआरला 20 षटकात 8 बाद 148 धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 67 तर केकेआरकडून आंद्रे रसेलने 48 धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत गुजरातकडून शामी, राशिद आणि दयालने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT