IPL 2024 RCB vs KKR sakal
IPL

IPL 2024 RCB vs KKR : कोलकाताचा धडाकेबाज विजय ; विराटच्या ८३ धावांनंतरही बंगळूरचा पराभव

विराट कोहलीच्या नाबाद ८३ धावांच्या खेळीनंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला शुक्रवारी आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : विराट कोहलीच्या नाबाद ८३ धावांच्या खेळीनंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला शुक्रवारी आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सने अवघ्या १६.५ षटकांत १८३ धावांचा यशस्वी पाठलाग करताना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. फिल सॉल्ट (३० धावा), सुनील नारायण (४७ धावा), व्यंकटेश अय्यर (५० धावा) व कर्णधार श्रेयस अय्यर (नाबाद ३९ धावा) यांची शानदार खेळी कोलकाताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली. संथ चेंडूवर फलंदाजी करण्यात बंगळूरचे फलंदाज अपयशी ठरले.

बंगळूरकडून कोलकातासमोर १८३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. फिल सॉल्ट व सुनील नारायण या जोडीने ८६ धावांची भागीदारी करताना विजयाची भक्कम पायाभरणी केली. सुनील ४७ धावांवर, तर सॉल्ट ३० धावांवर बाद झाले. मात्र त्यानंतरही कोलकाता संघाच्या धावसंख्येला ब्रेक लागला नाही. व्यंकटेश अय्यर व श्रेयस अय्यर या जोडीने ७५ धावांची भागीदारी करीत कोलकात्याचा विजय निश्‍चित केला.

व्यंकटेशने ३ चौकार व ४ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. श्रेयसने नाबाद ३९ धावा केल्या. दरम्यान, याआधी कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हर्षित राणा याने फाफ ड्युप्लेसिस याला ८ धावांवर बाद केले. त्यानंतर विराट कोहली व कॅमेरुन ग्रीन या जोडीने ६५ धावांची भागीदार रचली. आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात ग्रीनचा ३३ धावांवर त्रिफळा उडाला.

विराट व ग्लेन मॅक्सवेल ही महत्त्वाची जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच सुनील नारायण याने मॅक्सवेलला २८ धावांवर बाद करीत अडसर दूर केला. रजत पाटीदार याला आंतरराष्ट्रीय स्तरावर निराशेला सामोरे जावे लागले आहे. रसेलच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो रिंकू सिंगकरवी झेलबाद झाला.

विराट कोहलीने यंदाच्या मोसमातील दुसरे अर्धशतक साजरे केले. त्याने दिनेश कार्तिकच्या साथीने बंगळूरला २० षटकांत ६ बाद १८२ धावांपर्यंत मजल मारून दिली. विराटने ५९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८३ धावांची फटकेबाजी केली. कार्तिकने २० धावा केल्या. कोलकाताकडून रसेल व हर्षित यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक : बंगळूर - २० षटकांत ६ बाद १८२ धावा (विराट कोहली नाबाद ८३ - ५९ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार, कॅमेरुन ग्रीन ३३, ग्लेन मॅक्सवेल २८, आंद्रे रसेल २/२९) पराभूत वि. कोलकाता नाईट रायडर्स १६.५ षटकांत ३ बाद १८६ धावा (फिल सॉल्ट ३०, सुनील नारायण ४७, व्यंकटेश अय्यर ५०, श्रेयस अय्यर नाबाद ३९).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: ‘राष्ट्रवादी’च्या राज्य नेतृत्वामध्ये बदलाची शिफारस; प्रशांत किशोर यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी रणनीतीबाबत चर्चा

Maharashtra Teacher Recruitment : राज्यात 30 हजार, तर कोल्हापुरात 606 शिक्षकांची महाभरती; 'पवित्र पोर्टल'वर पसंतीक्रम नोंदणीला सुरुवात, झेडपी शाळांमध्ये सर्वाधिक 13,351 जागा

IND vs SL: टीम इंडिया ९ वर्षांनी श्रीलंकेत खेळणार कसोटी! कोणाच्या नावावर सर्वाधिक विकेट्स अन् धावा?

Marathi News Live Updates : राष्ट्रवादीसाठी आगामी रणनीती ठरवण्याच्या कामाला प्रशांत किशोर यांच्याकडून सुरुवात

Nagpur Ganeshotsav 2026: गणेशोत्सव मंडळांच्या परवानगीसाठी ‘सिंगल विंडो’ ; महापौर नीता ठाकरे;ऑनलाइन मिळणार सर्व ना हरकत प्रमाणपत्रे

SCROLL FOR NEXT