IPL

Video: भावानेच काढला भावाचा काटा; पांड्या बंधूत कृणाल पडला भारी

सकाळ डिजिटल टीम

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट या आयपीएलमधील दोन नव्या संघात आज पहिल्यांदाच लढत झाली. या दोन्ही संघाचा हा आयपीएलमधील पहिलाचा सामना होता. तसेच गुजरातचे दोन बंधू हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे दोघेही एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे या दोघांच्या एकमेकांविरूद्धच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष होते.

दरम्यान, लखनौने गुजरातसमोर 158 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर गुजरातची हे आव्हान पार करताना खराब सुरूवात झाली. मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्या आणि मॅथ्यू वेडने गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी रचली. ही जोडी जमली असे वाटत असतानाच कृणाल पांड्याने आपल्या भावाचाच काटा काढला. त्याने हार्दिकला 33 धावांवर बाद करत गुजरातला मोठा धक्का दिला. त्यानंतर मॅथ्यू वेड देखील पुढच्याच षटकात बाद झाल्याने गुजरातचा संघ अडचणीत आला.

दरम्यान, डेव्हिड मिलर आणि 21 चेंडूत 30 धावांची खेळी केली. त्याने तेवतियाबरोबर भागीदारी रचत सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर तेवतियाने 40 धावांची झुंजार खेळी करत गुजरातला अखेरच्या षटकात विजय मिळून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC: सवलतीत एसटीने प्रवास करता? १ ऑगस्टपासून हा नियम माहिती नसेल तर फटका बसू शकतो

Fifa World Cup 2026 : ३ रेड कार्ड, दोन भन्नाट गोल अन् १७ वर्षांच्या पोराचे पदार्पण... मेक्सिको-दक्षिण आफ्रिका, पहिलाच सामना गाजला

Yogi Avimukteshwaranand: योगी आदित्यनाथ - अविमुक्तेश्वरानंद वाद विकोपाला; ‘शंकराचार्य’ पदवीवर प्रश्‍नचिन्ह आणि गायीच्या दर्जावरून मतभेद

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं! जून महिन्यात सोन्याच्या भावात मोठी घसरण; आज किती आहे दर?

Kolhapur Water Supply : कोल्हापूर शहराची ‘थेट पाईप’ बंद पडली, धरणातील पाणी संपल्याने निर्णय

SCROLL FOR NEXT