K-S-Bharat 
IPL

IPL 2021: शेवटच्या चेंडूवर षटकार; RCB चा दिल्लीवर थरारक विजय

एका चेंडूत विजयासाठी ५ धावांची होती गरज

विराज भागवत

एका चेंडूत विजयासाठी ५ धावांची होती गरज

IPL 2021 DC vs RCB: दिल्लीविरूद्धच्या अटीतटीच्या सामन्यात RCBच्या केएस भरतने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीने २० षटकात १६४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूला शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज होती. त्यावेळी आवेश खानच्या गोलंदाजीवर RCBच्या केएस भरतने उत्तुंग असा षटकार लगावत सामना जिंकला.

हाच तो विजयी षटकार-

सामना 'असा' रंगला...

दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ५ बाद १६४ धावा केल्या. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या दोघांनी दिल्लीला दमदार सुरुवात मिळवून दिली. पृथ्वीने ४८ धावा केल्या तर शिखर धवन ४३ धावा काढून बाद झाला. या दोघांचीही अर्धशतके हुकल्यानंतर ऋषभ पंत (१०) आणि श्रेयस अय्यर (१८) स्वस्तात बाद झाले. अखेर शिमरॉन हेटमायरच्या २९ धावांच्या खेळी दिल्लीने १६०पार मजल मारली. मोहम्मद सिराजने २ तर चहल, पटेल आणि ख्रिश्चनने १-१ बळी टिपला.

या आव्हानाचा पाठलाग करताना देवदत्त पडीकल शून्यावर तर विराट कोहली ४ धावांवर बाद झाला. एबी डिव्हिलियर्सने चांगली सुरूवात केली होती. पण तो देखील २६ चेंडूत २६ धावांवर बाद झाला. पण श्रीकर भरतने धडाकेबाज अर्धशतक ठोकले. त्याला ग्लेन मॅक्सवेलनेही चांगली साथ देत अर्धशतक केले. या दोघांनी शतकी भागीदारी केली. सामना शेवटच्या षटकात पोहोचला असताना संघाला ६ चेंडूत १५ धावा हव्या होत्या. मॅक्सवेलने पहिल्या चेंडूवर चौकार मारला पण पुढील ४ चेंडूवर दोघांनाही मोठा फटका मारता आला नाही. एका चेंडूत ६ धावा हव्या असताना आवेश खानने वाईड चेंडू टाकला. त्यानंतर १ चेंडूत ५ धावांची गरज असताना भरतने षटकार मारून सामना जिंकला. भरतने ५२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७८ धावा केल्या. तर मॅक्सवेलने ३३ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT