Jonty Rhodes - Deepak Hooda | IPL Sakal
IPL

LSG vs CSK: 'धोनीला 5 बॉल लांब ठेवलं म्हणून...', लखनौच्या ड्रेसिंग रुममध्ये जॉन्टी ऱ्होड्सने का केलं हुड्डाचं कौतुक?

LSG Fielding Coach Jonty Rhodes: चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सचे फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्स यांनी झेल सोडणाऱ्या दीपक हुड्डाचं का कौतुक केलं जाणून घ्या.

Pranali Kodre

IPL 2024, LSG vs CSK: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 34 वा सामना शुक्रवारी (19 एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना पार पडला. एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनौने 8 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यानंतर लखनौच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार लखनौचा क्षेत्ररक्षक फलंदाज जॉन्टी ऱ्होड्सने घोषित केला.

दरम्यान, सर्वांना अपेक्षित होते की ऱ्होड्स अशा एका खेळाडूला पुरस्कार देईल, ज्याने क्षेत्ररक्षणात अफलातून कामगिरी केली असेल. मात्र ऱ्होड्सने हा सोहळा गमतीशीर केला आणि दिपक हुड्डाला झेल सोडण्यासाठी हा पुरस्कार दिला. त्याने यामागील मजेशीर कारणही सांगितले.

हुड्डाकडून झेल सुटल्याने चेन्नईचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला अधिकचे 5 चेंडू ड्रेसिंग रुममध्येच ठेवल्याने हा पुरस्कार ऱ्होड्स यांनी त्याला दिला.

झाले असे की 17 व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर रविंद्र जडेजाने मोहसीन खानच्या चेंडूवर एक जोरदार शॉट खेळला. तो चेंडू लाँग-ऑनच्या दिशेला गेला. यावेळी तिथे असलेल्या हुड्डाने झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याच्या हातातून सटकून सीमारेषेपार गेला. त्यामुळे जडेजाला षटकार मिळाला.

दरम्यान यानंतर सहा चेंडूंनंतर मोईन अली बाद झाला आणि त्यानंतर धोनी फलंदाजीला आला. धोनीने फलंदाजीला आल्या आल्या आक्रमक खेळ केला. त्याने त्यानंतर 9 चेंडूत 311 च्या स्ट्राईक रेटने 3 चौकार आणि 2 षटकारांसह 28 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईला 176 धावांपर्यंत पोहचणे शक्य झाले.

याच गोष्टींचा संदर्भ देत ऱ्होड्स ड्रेसिंग रुममध्ये मस्तीच्या मूडमध्ये असताना म्हणाले, 'क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार हा फक्त चांगल्या कामगिरीसाठी नाही, तर जागृकतेसाठीही आहे. चेन्नईच्या संघात एक व्यक्ती आहे एमएसडी, जो साधारण 400 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करतोय.'

'मला वाटते की बर्थडे बॉय दीपक हुड्डाचा हा हुशारीचा निर्णय होता की त्याने तो चेंडू षटकारासाठी जाऊ दिला. म्हणजेच धोनीला आणखी 5 चेंडू दूर ठेवता आले.'

ऱ्होड्सच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण ड्रेसिंग रुममध्ये हस्याचा फवारा उडाला. यानंतर ऱ्होड्सने जाऊन हुड्डाला मिठीही मारली.

दरम्यान, या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर चेन्नईकडून धोनीव्यतिरिक्त रविंद्र जडेजाने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली, तर अजिंक्य रहाणेने 36 आणि मोईन अलीने 30 धावांची छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. लखनौकडून गोलंदाजीत कृणाल पांड्याने 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर लखनौकडून कर्णधार केएल राहुलने 82 धावांची आणि क्विंटन डी कॉकने 54 धावांची खेळी केली. त्यामुळे त्यांच्या या खेळीने लखनौच्या विजयाचा पाया रचला.

त्यानंतर निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉयनिसने विजयावर शिक्कामोर्तब केले. पूरनने 23 धावांची नाबाद खेळी केली, तर स्टॉयनिसने 8 नाबाद धावांची खेळी केली. लखनौने 19 षटकात 177 धावांचे आव्हान पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT