lsg vs gt news | deepak hooda hugs krunal pandya
lsg vs gt news | deepak hooda hugs krunal pandya  sakal
IPL

GT VS LSG : 'जॉनी दुश्मनी'चा द एन्ड; कॅचमुळं दिसली क्रुणाल-हुड्डातील मैत्री

Kiran Mahanavar

IPL 2022 LSG VS GT : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये सोमवारी लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सामना झाला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 158 धावांची मजल मारली, पण या सामन्यात एक खास गोष्ट घडली जेव्हा लखनौचा संघ मैदानात उतरला. डावाच्या पहिल्याच षटकात गुजरातला मोठा धक्का बसला आणि स्टार खेळाडू शुभमन गिल खातेही न उघडता बाद झाला. दुष्मंथा चमीराच्या चेंडूवर शुभमन गिलने पॉइंटच्या दिशेने एक शॉट खेळला, तिथे उभ्या असलेल्या दीपक हुड्डाने त्याचा झेल टिपला.

दीपक हुडाने झेल पकडताच त्याच्या जवळ उभ्या असलेल्या कृणाल पांड्याने त्याला लगेच मिठी मारली. हे सेलिब्रेशन देखील खास होते कारण दीपक हुडा आणि कृणाल पंड्या यांचा स्वतःचा इतिहास आहे. खरे तर हे दोन्ही खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये बडोदा संघाकडून खेळायचे. कृणाल पांड्या संघाचा कर्णधार आणि दीपक हुडा उपकर्णधार होता. पण दोघांच्या संघात असे युद्ध पेटले की दीपक हुड्डा बडोद्याचा संघ सोडून दिला.

बडोदा संघात असताना दीपक हुडाने कृणाल पांड्यावर असभ्य असल्याचा आरोप केला होता. कृणालने करिअर संपवण्याची धमकी दिल्याचा आरोप दीपकने केला आहे. मात्र, आता दोघेही आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्सचा भाग आहेत. लखनौ संघाने कृणाल पंड्याला 8 कोटी आणि दीपक हुडाला 5.75 कोटींना खरेदी केले. दीपक हुडाने लखनौसाठी पहिल्याच सामन्यात ५५ धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT