IPL 2024 GT vs LSG
IPL 2024 GT vs LSG  sakal
IPL

IPL 2024 GT vs LSG : लखनौच्या विजयाची हॅट्‌ट्रिक ; गुजरातचा पराभव,यश ठाकूरचे पाच बळी

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : वेगवान गोलंदाज यश ठाकूर (५/३०), कृणाल पंड्या (३/११) यांची प्रभावी गोलंदाजी व मार्कस स्टॉयनिस (५८ धावा) याच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर लखनौ सुपरजायंटस्‌ संघाने रविवारी येथे झालेल्या आयपीएल लढतीत गुजरात टायटन्स संघावर ३३ धावांनी विजय मिळवला. लखनौचा हा सलग तिसरा विजय ठरला. गुजरातला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

लखनौकडून गुजरातसमोर १६४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. साई सुदर्शन व कर्णधार शुभमन गिल या जोडीने ५४ धावांची भागीदारी करताना सावध सुरुवात केली. यश ठाकूरच्या वेगवान चेंडूवर गिल १९ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर फिरकीच्या जाळ्यात गुजरातचा संघ अडकत गेला. बिनबाद ५४ या धावसंख्येवरून गुजरातची अवस्था ४ बाद ६१ धावा अशी बिकट झाली. रवी बिश्‍नोईने स्वत:च्या गोलंदाजीवर केन विल्यमसनचा उजव्या बाजूला उंच झेप घेऊन घेतलेला झेल अविस्मरणीय ठरला. त्यानंतर कृणाल पंड्याने साई सुदर्शनला ३१ धावांवर; तर बी. आर. शरथला २ धावांवर बाद केले.

चार प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर गुजरातचा संघ सावरलाच नाही. राहुल तेवतिया याने ३० धावांची खेळी केली; पण गुजरातचा डाव १३० धावांतच आटोपला. लखनौकडून यश ठाकूरने पाच, तर कृणाल पंड्याने तीन फलंदाज बाद केले. नवीन हक व रवी बिश्‍नोई यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

दरम्यान, याआधी लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार के. एल. राहुल व क्विंटॉन डी कॉक या जोडीला लखनौसाठी दमदार सलामी देता आली नाही. अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या गोलंदाजीवर डी कॉक सहा धावांवर नूर अहमदकरवी झेलबाद झाला. त्यानंतर उमेशनेच देवदत्त पडीक्कल याला सात धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

राहुल व मार्कस स्टॉयनिस या जोडीने २ बाद १८ या धावसंख्येवरून लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ७३ धावांची भागीदारी रचली; मात्र येथील खेळपट्टीवर धावा वेगाने होत नव्हत्या. दर्शन नाळकंडेने राहुलला ३३ धावांवर बाद करीत अडसर दूर केला. राहुलने ३१ चेंडूंच्या खेळीत तीन चौकार मारले. त्यानंतर स्टॉयनिसने ४३ चेंडूंमध्ये चार चौकार व दोन षटकारांसह ५८ धावांची खेळी साकारली. लखनौसाठी आणखी धावा त्याच्याकडून होणार, असे वाटत असतानाच दर्शनच्या गोलंदाजीवर बी. आर. शरथकरवी तो झेलबाद झाला.

पूरन-बदोनीची जोडी

लखनौसाठी निकोलस पूरन-आयुष बदोनी या जोडीने ३१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. बदोनी याने ११ चेंडूंमध्ये २० धावांची खेळी केली. यामध्ये तीन चौकारांचा समावेश होता. राशीद खानने त्याला बाद करीत जोडी तोडली. पूरन याने २२ चेंडूंमध्ये नाबाद ३२ धावांची खेळी केली. तीन षटकार मारण्यात त्याला यश मिळाले. लखनौने २० षटकांत ५ बाद १६३ धावा फटकावल्या. गुजरातकडून उमेश व दर्शन यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक ः लखनौ सुपरजायंटस्‌ २० षटकांत ५ बाद १६३ धावा (के. एल. राहुल ३३, मार्कस स्टॉयनिस ५८, निकालस पूरन नाबाद ३२, आयुष बदोनी २०, दर्शन नाळकंडे २/२१, उमेश यादव २/२२) विजयी वि. गुजरात टायटन्स सर्व बाद १३० धावा (साई सुदर्शन ३१, राहुल तेवतिया ३०, यश ठाकूर ५/३०, कृणाल पंड्या ३/११).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT