Lucknow Super Giants | IPL 2024 Sakal
IPL

IPL 2024: दोन विजयांनंतर लखनऊला तगडा झटका! 6 कोटींचा खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर, Video शेअर करत दिली माहिती

Lucknow Super Giants: लखनऊ सुपर जायंट्सने लिलावात 6.40 कोटींना खरेदी केलेल्या खेळाडूला अचानक संपूर्ण हंगामातून बाहेर व्हावे लागले आहे.

Pranali Kodre

Lucknow Super Giants News: इंडियन सुपर लीग 2024 स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्सने मंगळवारी (2 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगळरुविरुद्ध 28 धावांनी विजय मिळवला. हा लखनऊचा सलग दुसरा विजय ठरला. मात्र या विजयानंतर लखनऊला मोठा धक्का बसला आहे.

लखनऊचा 25 वर्षीय वेगवान गोलंदाज शिवम मावी आयपीएलच्या 17 व्या हंगामातून बाहेर झाला आहे.

दरम्यान, त्याला कोणती दुखापत झाली आहे, याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, लखनऊने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मावीने त्याला दुखापतीमुळे या आयपीएल हंगामातून बाहेर पडावे लागल्याचे सांगितले आहे.

व्हिडिओमध्ये मावीने सांगितले, 'मी स्पर्धा खूप मीस करेल. मी इथे दुखापतीनंतर आलो होतो आणि विचार केला होता. की मी संघासाठी सामने खेळेल आणि चांगली कामगिरी करेल. पण दुर्दैवाने मला ही स्पर्धा सध्या सोजावी लागत आहे कारण मला दुखापत झाली आहे.'

'एक क्रिकेटपटू म्हणून अशा परिस्थितीसाठी मानसिक कणखरता असावी लागते. जर तुम्हाला दुखापत असेल, तर तुम्ही पुनरागमन कसे करू शकता, याचा विचार करावा लागतो. तुम्हाला कशाची काळजी घ्यावी लागेल, हे पाहावे लागते.आपला खूप चांगला संघ असून मी संघाला चिअर करत राहिल.'

मावीला आयपीएल 2024 च्या आयपीएल लिलावात लखनऊने 6.40 कोटींना खरेदी केले होते. दरम्यान, तो लखनऊने खेळलेल्या पहिल्या तिन्ही सामन्यात खेळला नव्हता. आता तो संपूर्ण हंगामातूनच बाहेर झाला आहे.

मावीने आयपीएलमध्ये 2018 साली पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 32 सामने खेळले असून 30 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, मावीच्या बदली खेळाडूची घोषणा अद्याप लखनऊने केलेली नाही. सध्या लखनऊ संघात मॅट हेन्री, शामर जोसेफ, मोहसिन खान, नवीन-उल-हक, मयंक यादव, यश ठाकूर, अर्शद खान आणि युधवीर सिंग हे वेगवान गोलंदाजीसाठी पर्याय आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT