Lucknow Super Giants vs Chennai Super King  esakal
IPL

LSG vs CSK : पावसामुळे चेन्नई - लखनौ सामना अनिर्णित, दोघांना मिळाले समान गुण

अनिरुद्ध संकपाळ

Lucknow Super Giants vs Chennai Super King : लखनौच्या भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये आज महेंद्रसिंह धोनी अवतरला होता. त्यामुळे सर्व स्टेडियम पिवळ्या रंगात रंगून गेले. मात्र सामन्याची एक इनिंग संपण्यास काहीच चेंडू शिल्लक असताना पावसाने आपला खेळ सुरू केला आणि धोनीची बॅटिंग पाहण्याची लखनौकरांची संधी हिरावून गेला. पावसामुळे सामना कोणताही निकाल न लागता संपला. पावसाला सुरूवात होण्यापूर्वी प्रथम गोलंदाजी करणाऱ्या चेन्नईने लखनौची अवस्था 19.2 षटकात 7 बाद 125 धावा अशी केली होती. लखनौच्या आयुष बदोनीने 33 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या होत्या. तर चेन्नईकडून मोईन अली, तिक्षाणा आणि पथिराना यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

पावसामुळे सामना अनिर्णित, दोन्ही संघांना मिळाले प्रत्येकी 1 गुण

125-7 (19.2 Ov) : अखेर पथिरानाने जोडी फोडली

निकोलस पूरन आणि आयुष बदोनी यांनी सहाव्या विकेटसाठी 48 चेंडूत 59 धावांची भागीदारी रचत संघाला 103 धावांपर्यंत पोहचवले. माज्ञ 18 व्या षटकात मथिशा पथिरानाने निकोलस पूरनला 20 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. मात्र यानंतर आयुष बदोनीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत स्लॉग ओव्हरमध्ये फटेकबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर लखनौ देखील 125 धावांपर्यंत पोहचली, दरम्यान, पावसाला सुरूवात झाली.

पूरन - बदोनीची भागीदारी 

लखनौचा निम्मा संघ 44 धावात गारद झाल्यानंतर निकोलस पूरन आणि आयुष बदोनीने सहाव्या विकेटसाठी भागीदारी रचत लखनौचा डाव सावरला. या दोघांनी ही भागीदारी अर्धशतकापर्यंत पुढे नेते संघाला शंभरच्या जवळ पोहचवले.

44-5 : लखनैचा निम्मा संघ पन्नाशीच्या आतच गारद 

चेन्नईच्या फिरकीपटूंनी लखनौचा निम्मा संघ 50 धावातच गारद केला. पॉवर प्लेमध्ये मोईन अली आणि तिक्षाणा यांनी लखनौला धक्के दिले तर पॉवर प्लेनंतर रविंद्र जडेजाने लखनौच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यास सुरूवात केली. त्यामुळे लखनौची अवस्था 12 षटकात 5 बाद 52 धावा अशी झाली.

27-2 : पॉवर प्लेमध्ये लखनौची संथ सुरुवात

प्रथम गोलंदाजी करणाऱ्या सीएसकेने पॉवर प्लेमध्ये लखनौच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले. मोईन अलीने कायल मेयर्सला 14 धावांवर बाद केल्यानंतर लखनौच्या मनन वोरा आणि करण शर्मा यांना 5 षटकात 25 धावा करता आल्या. अखेर पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात तिक्षाणाने मनन वोराला 10 धावांवर बाद करत लखनौला दुसरा धक्का दिला. तिक्षाणाने पाठोपाठ काळजीवाहू कर्णधार कृणाल पांड्याला पुढच्याच चेंडूवर भोपळाही न फोडता माघारी धाडले.

धोनीने नाणेफेक जिंकली

महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पावसामुळे नाणेफेकीस उशीर

चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय नाणेफेकीस उशीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT